मुंबई

मनसेचे ‘टार्गेट भाजप’

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः अजित पवार यांच्या शिंदे सरकारमधील प्रवेशानंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलले आहे. मनसेही याला अपवाद नाही. काही महिन्यांपूर्वी गळ्यात गळा घालणारे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांत आठवडाभरापासून ट्विटरवर युद्ध सुरू झाले आहे. एरवी उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर धो-धो धुणाऱ्या मनसे नेत्यांच्या टार्गेटवर आता अचानक भाजप आला आहे. यानिमित्ताने राज्यातील विरोधी पक्षांची निर्माण झालेली जागा व्यापण्याचा प्रयत्न मनसे करत आहे; मात्र वारंवार भूमिका बदलणाऱ्या मनसेसाठी तसे करणे सोपे नसल्याचेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अमित ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर त्यांच्या समर्थकांनी समृद्धी महामार्गावरचा टोल नाका फोडला. या प्रकरणानंतर भाजप आणि मनसेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यानंतर मनसेने ‘विसरला नाही महाराष्ट्र’ या कँपेनच्या माध्यमातून महाराष्ट्र सदन, सिंचन घोटाळा आदी घोटाळ्यांची आठवण करून देणारी मालिकाच सुरू केली. मणिपूर हिंसाचार, सिंचन घोटाळा, पालकमंत्री दालनापासून सर्व मुद्द्यांवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. मणिपूरवरून स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
एकनाथ शिंदेंपाठोपाठ ज्युनिअर पवार भाजपसोबत गेल्यामुळे मनसेने आपली भूमिका बदलली आहे. या घडामोडीमुळे विरोधी पक्षात स्थान मिळवण्याचा प्रयत्न मनसे करत आहे; मात्र केवळ सोशल मीडियावर टीका करून मनसेला जनतेतील प्रभाव परत मिळवणे हे एवढे साधे काम नसल्याची पुस्तीही राजकीय विश्लेषक जोडत आहेत.
...
मनसे भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करते आहे, हे खरे आहे; मात्र ते विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करताहेत का, यासाठी मनसेची पुढील भूमिका बघावी लागेल. सध्या राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे बलाढ्य नेते सक्रिय असताना मनसेला त्यांची जागा सहज घेता येणे अवघड आहे. तसे करण्याचा प्रयत्न मात्र ते नक्की करतील.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
...
तीन पक्ष एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षासाठी एक ‘स्पेस’ तयार झाली आहे. ती घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे. त्या दिशेने त्यांची सध्याची विधाने सुरू आहेत; मात्र हा प्रयत्न असफल होणार आहे.
- सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
...
भाजपच्या टीकेला मनसे कार्यकर्त्यांकडून प्रतिउत्तर दिले जात आहे. भाजपवरील टीका ही काही मनसेची अधिकृत भूमिका नाही. त्याबद्दलचा निर्णय स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे घेतील.
- बाळा नांदगावकर, नेते, मनसे
...
मनसेकडून टार्गेट...
१. मनसेच्या ट्विटर हँडलवर भाजपवरील टीकेचा खच
२. मणिपूरच्या घटनेवरून मनसेची भाजपवर जहरी टीका
३. टोलनाका तोडफोडीनंतर भाजप नेते आणि गडकरी लक्ष्य
४. अजित पवारांच्या घोटाळ्यावरील भाजपचे जुने ट्विट उकरून काढले
५. लोढा यांच्या पालिकेतील दालनाला कडाडून विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT