मुंबई

महिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे बळ

CD

मुंबई, ता. २६ ः मूलत: उद्यमशील स्वभाव असलेल्या महिलांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे पाठबळ त्यांना सदैव मिळेल, असे आश्वासन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र चेंबर, महिला उद्योजकता समिती व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय व्यापार व महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी’ या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, महिला उद्योजकता समितीच्या को-चेअरपर्सन कविता देशमुख, धनश्री हरदास, महिला समिती सदस्या श्वेता इनामदार, गौरी खेर, गीता करमसी, महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे आदी यावेळी उपस्थित होते.

वर्ल्ड ट्रेड सेंटर (मुंबई)च्या संचालक रुपा नाईक यांनी ‘आंतरराष्ट्रीय व्यापार’ या विषयावर मार्गदर्शन केले. १९० देशांत ३३० वर्ल्ड ट्रेड सेंटर असून या सर्व देशांत महाराष्ट्र चेंबरच्या महिला सदस्यांना बाजारपेठा, तसेच खरेदीदार शोधण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर सर्वोतोपरी मदत करेल. तयार कपडे, दागिने, खाद्यान्न अशा प्रकारच्या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या देशांमधील गरजांनुसार महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करता येईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय सरव्यवस्थापक समीर महापुष्पे, संदीप सुर्वे यांनी ‘महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी’ या विषयावर मार्गदर्शन करताना मुंबई बँकेतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT