मुंबई

धुम्रपान न करणारेही कर्करोगाच्या विळख्यात

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : फुप्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सध्या, फुप्फुसाच्या कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, धुम्रपान करणाऱ्यांना फुप्फुसाचा कर्करोग होते, असे म्हटले जाते; परंतु धुम्रपान न करणारे ९० टक्के रुग्ण कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्प्यात डॉक्टरांकडे येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाच्या लक्षणांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

१ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुप्फुस कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. भारतात पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगानंतर फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.
त्यातच धुम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान होते. प्रदूषण आणि दूषित रसायने हे यामागील मुख्य कारण आहे. या कर्करोगामध्ये ताप आणि कफ ही लक्षणे दिसत असल्याने नागरिक दुर्लक्ष करतात. त्यामुळे थेट तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात रुग्णाना कर्करोगाचे निदान होते.

सध्या फुफ्फुसाचा कर्करोग असणारे बहुतांश रूग्ण हे धुम्रपानाचे सेवन न करणारे आहेत. बऱ्याचदा प्रदूषण आणि घातक रसायनांच्या संपर्कात आल्याने रुग्णांना फुप्फुसाचा कर्करोग होतो. दरवर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाने पीडित १० ते १५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यातील ९० टक्के रुग्ण कर्करोगाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात उपचारासाठी आले होते. अशा रुग्णांवर रेडिएशन आणि किमोथेरपीद्वारे उपचार करण्यात आले. कर्करोगाचा संसर्ग एकाच फुप्फुसात झाला असेल तर उपचारांनी बरा होऊ शकतो; मात्र दोन्ही फप्फुसामध्ये कर्करोग पसरला असेल तर धोका जास्त वाढतो, असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुंदराम पिल्लई यांनी सांगितले. फुप्फुसाच्या कर्करोगापासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घ्यावा. आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येतो, असेही त्यांनी सांगितले.

फुप्फुसाचा कर्करोग हा सायलेंट किलर आहे. या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात क्वचितच लक्षणे आढळतात. खोकताना रक्त येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, अनपेक्षित वजन कमी होणे, हाडे दुखणे ही लक्षणे आहेत. धुम्रपान करत नाही परंतु सिगारेटच्या धुराच्या संपर्कात असाल तर फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. शिशिर शेट्टी, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT