हृदयविकार रुग्णावर यशस्वी उपचार
ेाकोविडचा वैद्यकीय इतिहास, तणाव टेस्ट होती पॉझिटिव्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कोविडचा वैद्यकीय इतिहास असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णावर वोक्हार्ट रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. परीन संगोई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुंबईतील ४० वर्षीय तरुणाला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. पायऱ्या चढ-उतार करताना धाप लागत होती. त्यांच्यावर मुंबई सेंट्रल च्या वोक्हार्ट रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. परीन संगोई यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले. काही चाचण्या केल्यावर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले दिसले. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्यांना सप्टेंबर २०२० मध्ये कोविड झाला होता. दरम्यान, अचानक धाप लागल्यामुळे त्यांनी रुग्णाची तणाव टेस्ट चाचणीही (ट्रेड मिल टेस्ट) घेतली होती. यात हृदयाला गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होत असल्याचे दिसून आल्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये थर जमा झाल्याने ही शस्त्रक्रिया केली. त्यानंतर धमनीमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे आढळल्यावर रुग्णावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. सध्या रुग्णाची प्रकृती व्यवस्थित आहे.
............................................
प्रतिक्रीया
हृदयविकाराच्या समस्येसह तरुणाला उपचार करणे काहीसे आव्हानात्मक होते. स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस होते. त्यात कोविड झाला होता. वेळेतच अँजिओप्लास्टी झाल्याने आम्ही रुग्णाला धोकादायक स्थितीपर्यंत जाण्यापासून वाचवू शकलो.
- डॉ. परीन संगोई, वोक्हार्ट, हृदयविकार शल्यचिकित्सक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.