मुंबई

कामा रुग्णालयात रेडिएशन मशीन बंद

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : राज्य सरकारच्या मुंबईतील कामा आणि ऑल्ब्लेस रुग्णालयातील ‘रेडिएशन थेरपी’ मशीन बंद असल्याने कर्करुग्णांच्या उपचारात खंड पडला आहे. परवडणाऱ्या दरात रेडिएशन थेरपी मिळत असल्याने अनेक रुग्ण कामा रुग्णालयात येतात; परंतु गेल्या वर्षभरापासून ही सुविधाच बंद असल्याने कर्करुग्णांची गैरसोय होत आहे.
 
कामा रुग्णालयातील रेडिएशन थेरपी मशीन ही १० वर्षांपूर्वी वापरण्यास सुरुवात झाली. २०१३ पासून ८१ हजारांहून अधिक रुग्णांवर या मशीनद्वारे उपचार करण्यात आले; मात्र मे २०२२ मध्ये ही मशीन बाद झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णांना टाटा रुग्णालयात पाठवण्यात येते. या दोन्ही रुग्णालयांमध्ये आधीच उपचारासाठी येणाऱ्या कर्करोगग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रेडिएशन थेरपीसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या रुग्णालयाने दोन मशीनच्या मंजुरीसाठी सरकार, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यापैकी ‘कोबाल्ट’ ही पहिली मशीन येत्या तीन महिन्यांत रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. कोबाल्ट मशीनमधून काही ठराविक प्रकारची क्ष-किरणे निघतात आणि काही ठराविक आजारांसाठीच या मशीनचा फायदा होतो; मात्र ‘लिनियर अॅक्सिलेटर’च्या अत्याधुनिक रेडिएशन मशीनसाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

वर्षभराची प्रतीक्षा
‘लिनियर ॲक्सिलेटर’ खरेदी करण्यासाठी ३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे; तर ६ ते ७ कोटी रुपये खर्चाचे कोबाल्ट मशीन खरेदी करण्याचा दुसरा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर होईल आणि कोबाल्ट तीन महिन्यांत; तर मोठे मशीन वर्षभरात मिळेल, असे रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT