मुंबई

ऑस्ट्रेलिया

CD

पर्यटकांना ऑस्ट्रेलिया टुरिझमचे प्रोत्साहन 
मुंबई, ता. २० ः ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन क्षेत्रासाठी भारत हा प्रमुख देश असून त्यातील वीस टक्के पर्यटक महाराष्ट्रातील असल्यामुळे येथील पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलिया टुरिझमने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती टुरिझम ऑस्ट्रेलियाचे कंट्री मॅनेजर निशांत काशीकर यांनी ‘सकाळ’ला दिली.
कोविडचा प्रकोप संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पर्यटकांसाठी सीमा खुल्या केल्यावर आता तेथील भारतीय पर्यटकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही त्वरेने मार्गी लागल्यामुळे भारतीय उद्योगपतींच्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या औद्योगिक बैठका, परिषदा, कार्यक्रम हेदेखील वाढले आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विमान फेऱ्याही तिप्पट वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी मुलाखत, दूतावासाबाहेर रांगा, पासपोर्ट देणे, आपल्या बायोमेट्रिक तपशील देणे या गोष्टी कराव्या लागत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होऊन डिजिटल व्हिसा ई मेलवर मिळतो. व्यापार-उद्योगांसाठी तीन वर्षांपर्यंत मल्टिपल एन्ट्री व्हिसा आणि पाच वर्षांपर्यंत बिझनेस व्हिसा मिळतो. तसेच त्यांच्यासाठी विशेष सिंगल विंडो क्लिअरन्स असून त्यांना विशेष अधिकाऱ्याची मदत आणि विशेष ग्रुप आयडीदेखील मिळतो, असेही काशीकर म्हणाले.

विशेष कार्यक्रम
भारतीयांमध्ये ऑस्ट्रेलिया टुरिझमचा प्रसार करण्यासाठी मागील वर्षीच्या टी ट्वेंटी वर्ल्डकप दरम्यान येथून १७ मान्यवरांना तेथे देण्यात आले होते. त्याचप्रमाणे आपल्या क्रिकेट संघालाही रोटेनेस्ट बेटावर एक दिवसांच्या विशेष पर्यटनासाठी नेण्यात आले. वीणा, केसरी, भाग्यश्री यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑस्ट्रेलिया टुरिझम विभाग विशेष प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे एसओटीसी, मेक माय ट्रिप, थॉमस कुक यांच्याबरोबरही आम्ही विशेष कार्यक्रम घेतो. श्रेया पिळगावकर, मिथिला पालकर यांच्याबरोबरही यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे निशांत काशीकर म्हणाले. 

सवलतींचा फायदा
ऑस्ट्रेलियात भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. कोविडनंतर ऑस्ट्रेलियात एकोणीस हजार खोल्यांची दोनशे नवीन हॉटेल उघडली आहेत. लक्झरी लॉज, वाइनरी, मासेमारीचा अनुभव, वन्यजीव, ग्रेट गोल्फ, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा लाभ पर्यटक घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियाच्या आल्प्स पर्वतात युरोपपेक्षाही जास्त बर्फवृष्टी होते. आता भारतात लग्नसराईचा हंगाम येत असल्याने ही जोडपीदेखील ऑस्ट्रेलियालाच हनिमूनसाठी प्राधान्य देत आहेत. ऑस्ट्रेलिया ही साहसी क्रीडाप्रकारांची जागतिक राजधानी आहे, त्यामुळे या सवलतींचा फायदा महाराष्ट्रीयन आणि भारतीय पर्यटकांनी घ्यावा, असेही काशीकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT