मुंबई

चेंबूरची हवा सर्वाधिक वाईट

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : वाढत्या उष्णतेमुळे आणि हवेच्या प्रवाहामुळे मुंबईतील हवेत धूळ मिसळली आहे. चेंबूर येथे आज हवा गुणवत्ता निर्देशांक २७०, तर कुलाब्यात २५६ एक्यूआय असा वाईट स्तरावर नोंदवला गेला. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५० ते २००च्या मध्ये नोंदवला गेला.
हवेची गुणवत्ता पातळी २०० ते ३०० एक्यूआयदरम्यान असेल तर ती खराब मानली जाते. ज्या लोकांना आधीच श्वसनाचे आजार आहेत, त्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात. सध्या मुंबईतील हवेची सरासरी गुणवत्ता १०० ते २०० एक्यूआयदरम्यान राहत आहे. जी मध्यम श्रेणीत येते. तथापि काही भागांत हवेची पातळी खराब श्रेणीपर्यंत पोहोचते आहे. शुक्रवारी हेच दिसून आले. हवेच्या गुणवत्तेच्या स्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) नुसार, चेंबूरमध्ये २७० तर कुलाब्यात २६५ एक्यूआय गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला.
...
हवेचा दर्जा समाधानकारकवरून खराब झाला असला तरी त्याचा कोणताही मोठा परिणाम जाणवणार नाही. हवेचा दर्जा सुधारेल. वाढत्या उष्णतेमुळे त्यात हलक्या हवेच्या प्रवाहामुळे मुंबई आणि आसपासच्या विभागातील धूळ हवेत पसरली आहे.
- गुफरान बेग, माजी प्रकल्प संचालक, सफर
...
परिसर-हवा गुणवत्ता निर्देशांक-दर्जा
मालाड १७३ मध्यम
माझगाव १५३ मध्यम
अंधेरी १०५ समाधानकारक
चेंबूर २७० वाईट
भांडुप १२२ मध्यम
बीकेसी १८९ मध्यम
कुलाबा २५६ वाईट
बोरिवली १६२ मध्यम
वरळी ८३ चांगला
नवी मुंबई १८२ मध्यम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT