Winter In Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईत गारवा वाढला मात्र प्रदूषणही निवळले!

आज सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.६ अंश नोंदवण्यात आले. किमान तापमानात साधारणतः तीन ते चार अंशांची घट झाली आहे. यामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक बनले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईतील किमान तापमान १७ अंशांपर्यंत खाली आले आहे. गारवा वाढणे हे प्रदूषण वाढीचे चिन्ह असते; परंतु मुंबईतील प्रदूषण निवळले असून मुंबईचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाला आहे.

हवामान तज्ज्ञांनी मुंबईत थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार किमान तापमानात घट झाली आहे. आज सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.६ अंश नोंदवण्यात आले. किमान तापमानात साधारणतः तीन ते चार अंशांची घट झाली आहे. यामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक बनले आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये हवेचा वेग मंदावत असल्याने प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. असे असताना मुंबईतील प्रदूषणाची पातळी मात्र नियंत्रणात आहे. मुंबईत शनिवारी कुठेही प्रदूषणाची नोंद झाली नाही.

शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ९९ सह समाधानकारक नोंदला गेला. सर्वाधिक स्वच्छ हवा विलेपार्ले येथे (६१) नोंदवण्यात आली. त्याखालोखाल मुलुंड ६१, भायखळा ७०, कांदिवली ७३, वरळी ७४ असा हवा गुणवत्ता निर्देशांकासह समाधानकारक नोंदवण्यात आला.

चेंबूर, बीकेसी, बोरिवली या भागात बऱ्याचदा प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते, मात्र याही भागातील हवा गुणवत्ता सुधारल्याचे दिसले.

चेंबूर १०४, बोरिवली १०९ आणि बीकेसीत हवा गुणवत्ता निर्देशांक १७५ असा मध्यम नोंदवण्यात आला. सध्या मुंबईत सुरू असलेली स्वच्छता मोहीम आणि बांधकाम नियमावलीमुळे हवेचा स्तर सुधारल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे देवगिरीवर दाखल

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT