Mumbai News: हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराबाबत जनजागृती करणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाला सीपीआर प्रशिक्षण (कृत्रिम श्वासोच्छ्वास) असणे आवश्यक आहे.
त्यानुसार मुंबईच्या ८८ रेल्वे स्थानके आणि १०० मेट्रो स्थानकांवर १८८ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) मशीन बसवण्यात येणार आहे. यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट’ने पुढाकार घेतला आहे.
हृदयविकाराबात जनजागृतीसाठी ‘दिल की बातें’ या संगीताच्या कार्यक्रमातून सर्वसामान्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने यासाठी पुढाकार घेतला असून ‘ट्यूनिंग फोल्क्स’ नावाच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समूहाने खास निधी गोळा करून प्रत्येक रेल्वे स्थानकावर सीपीआर देण्यासाठी एईडी मशीन्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्डिॲक अरेस्टबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १८८ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर बसवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी काही दात्यांना आव्हान करण्यात आले आहे.
ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर मशीनचा वापर हा अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकांचा जीव वाचवणे आणि त्यांना त्वरित सीपीआर मदत मिळावी, यासाठी केला जातो. ही उपकरणे एखाद्याला जीवघेण्या परिस्थितीतून वाचवून त्या व्यक्तीच्या हृदयाचे कार्य सुरळीपणे पार पाडण्यासाठी वापरतात, असे रोटरी क्लबतर्फे सांगण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय मेहता म्हणाले की, मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला तत्काळ सीपीआरचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून जीव वाचवावा, हा उद्देश आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत एईडी मशीनचा वापर केला जाऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करून देण्याचा वैद्यकिय तज्ज्ञांचा प्रयत्न आहे. रोटरी क्लबने याआधीच सुमारे १० एईडी मशीन दान केले आहेत. या उपक्रमाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील ८८ उपनगरीय रेल्वे स्थानके आणि १०० मेट्रो स्थानके यांसारख्या आणखी १८८ ठिकाणी एईडी मशीन उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.