मुंबई

Rani Bag: प्राण्यांना पण येतो Heart Attack? राणीबागेतील तब्बल 'इतक्या' प्राण्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून माहिती उघड

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील ४७ प्राणी आणि पक्ष्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.

यात सर्वाधिक समावेश हरणांचा आहे. हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांच्या वार्षिक अहवालात दिली आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहालयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. प्राधिकरणाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालात काही ठळक बाबींचा समावेश केला आहे. धोक्यात असलेल्या प्रजातींसह इतर प्राणी हृदयाचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या विविध आजारांना बळी पडत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. राणीबागेत वर्षभरात ४७ पैकी २९ प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. मात्र सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू या कारणांमुळे का होत आहे याची कारणमीमांसा अद्याप झालेली नाही. यामुळे याची चौकशी होणे गरजेची असल्याची मागणी प्राणिप्रेमी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT