मुंबई

निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः विल्सन जिमखान्याचे मैदान जैन संस्थेला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर आता ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या सदस्यांनीही निर्णय रद्द करा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
विल्सन जिमखाना प्रकरण चांगलेच तापू लागले आहे. या मुद्द्यावर ‘आम्ही गिरगावकर’चे सदस्य चांगलेच आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबई जैन लोकांना आंदण देण्याचा घाट घातला जात आहे. यापूर्वीही मूळ मराठी लोक व इतर हिंदू लोकांच्या राहणीमानावर आणि त्यांच्या मांसाहारावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला आहे. नवीन टॉवरमध्ये मराठी माणसांना जाणीवपूर्वक फ्लॅट नाकारायचे धोरण अवलंबले आहे. आता तर या विभागातील पुरातन विल्सन जिमखाना त्यांच्या घशात कोंबण्याचे काम चालू असल्याचे चळवळीचे प्रमुख सौरव सागवेकर यांनी सांगितले. त्यांची वक्रदृष्टी विभागातील मोकळ्या मैदानांवर वळली आहे. स्वतःला सैनिक म्हणवून घेणारे नेते आणि कार्यकर्ते आता मूग गिळून गप्प आहेत. ‘आम्ही गिरगावकर’ याविरोधात आवाज उचलायला तयार आहे. लोकांनीही या लढ्यात एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. जर आपण असेच सहन करीत राहिलो, तर भविष्यातील पिढ्या आपल्याला या घोडचुकीबद्दल कधीही क्षमा करणार नाहीत, असा सावध इशाराही सागवेकर यांनी दिला आहे.
---------------------------------
मुंबईतील मराठी माणसाला डिवचण्याचा आणि चिडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर असेच सुरू राहिले, तर मैदानासमोरून मांसाहार करणाऱ्या मराठी माणसांना प्रवेश बंदी आहे, असे बोर्ड लागल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.
- सौरव सागवेकर, प्रमुख, ‘आम्ही गिरगावकर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT