मुंबई

जेईई मेनचा निकाल जाहीर

CD

मुंबई, ता. २५ : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)मार्फत देशभरातील आयआयटीसह देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.ई., बी.टेक प्रवेशासाठी दुसऱ्या सत्रासाठी घेण्यात आलेल्या जेईई (मेन)२०२४ या सामाईक परीक्षेचा पेपर-१चा निकाल जाहीर झाला आहे. यात वाशीमच्या बेलखेड जिल्ह्यातील मंगरूळपीर गावातील नीलकृष्ण गजरे देशात रँकमध्ये पहिला आहे. तर नवी मुंबईचा दक्षेश मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे.
राज्यातील तब्बल सात विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहेत. यात प्रकाश आर्यन, मुहंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव, प्रणव पाटील आणि अर्चित पाटील यांचा समावेश आहे. एनटीएमार्फत ४ ते ९ एप्रिल या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. यात ११ लाख ७९ हजार ५६९ जणांनी नोंदणी केली त्यातील १० लाख ६७ हजार ९५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ५६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यात तेलंगणा राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत.
-------------------------------------
प्रवर्गनिहाय मिळवलेले यश
जेईई मेनच्या परीक्षेत प्रवर्गनिहाय १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यात सर्वसाधारण प्रवर्गातून दक्षेश मिश्रा, आर्यन प्रकाश, मुहंमद सुफियान, विशारद श्रीवास्तव आणि अर्चित पाटील यांचा समावेश आहे. तर ओबीसी (एनसीएल)मधून गजरे नीलकृष्णा, प्रणव पाटील यांचा समोवश आहे. देशात एससीतून तमिळनाडूतील आराधना आर. आणि एसटीतून देशात जगन्नाधाम मोहिथ याचा समावेश आहे. या दोघांना ९९.९९ इतके पर्सेंटाईल मिळाले आहेत. मुलींमध्ये देशात कर्नाटकाची सनवी जैन आणि दिल्लीची शायना सिन्हाचा समावेश आहे. तृतीयपंथींमध्ये पश्चिम बंगाल येथील भूमिका सहा ही विद्यार्थिनी असून तिला ५६.६७ पर्सेंटाईल मिळाले आहेत.
---------------------------------------
टाय-ब्रेकिंग पद्धतीतून निवड
देशातील ५६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले असले तरी टायब्रेक नियमांसह गजरे हा देशात प्रथम स्थानावर आणि नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा द्वितीय स्थानावर आहे. जर दोन उमेदवारांनी एनटीएच्या परीक्षेत समान स्कोअर मिळवले असल्याने त्यांच्यातील टाय सोडवण्यासाठी टाय-ब्रेकिंग पद्धत वापरली जाईल. एनटीएच्या नियमानुसार त्यात गणिताचे गुण तपासले जातील, त्यानंतर उमेदवारांचे भौतिकशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र, त्यानंतर चाचणीतील सर्व विषयांमध्ये चुकीची उत्तरे आणि बरोबर उत्तरे यांचे कमी प्रमाण वय आणि त्यानंतर चढत्या क्रमाने अर्ज क्रमांक पाहिले जातील.
--------------------------------------
प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
प्रवर्ग संख्या
जनरल ३,७७,९२१
जन-ईडब्ल्यूएस १,३४,४६५
ओबीसी-एनसीएल ४,१६,४४०
एससी १,०३,४२२
एसटी ३५,७११
तृतीयपंथी ८
दिव्यांग ३,३६९
एकूण १०,६७,९५९
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT