मुंबई

आई-बाळच्या मृत्यूची चौकशी होणार

CD

आई-बाळाच्या मृत्यूची चौकशी होणार
तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : भांडुपच्या सुषमा स्वराज महापालिका प्रसूतिगृहात प्रसूतीनंतर महिला आणि नवजात बालकाच्या मृत्यूचे प्रकरण तापले आहे. येथे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती झाली होती. केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील १० तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
चौकशी समिती आठवडाभरात आपला अहवाल देणार असून निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
भांडुपच्या सुषमा स्वराज महापालिका प्रसूतिगृहात सोमवारी सैदुन्निसा नावाच्या महिलेची प्रसूती होत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली; मात्र प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. सिझेरियनच्या वेळी प्रचंड रक्तस्राव झाल्याने महिलेला सायन रुग्णालयात दाखल केले; मात्र तिचाही मृत्यू झाला.
...
आठवडाभरात अहवाल
चौकशी समितीत स्त्री-रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, केईएम, सायन आणि नायर रुग्णालयातील सर्जन यांसारख्या १० तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून आठवडाभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT