मुंबई

पल्मोनरी पुनर्वसन केंद्र सुधारतेय श्वसनप्रक्रिया

CD

पल्मोनरी पुनर्वसन केंद्र सुधारतेय श्वसन क्रिया
रुग्णांचा वाढता प्रतिसाद, आतापर्यंत सात हजारांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी मुंबई महापालिकेत सुरू झालेली फुप्फुस पुनर्वसन केंद्रे आणि सरकारी रुग्णालये रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. या केंद्रांद्वारे टीबी आणि फुप्फुसाशी संबंधित विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना श्वासोच्छ्‌वास सुधारण्यासाठी युक्त्या शिकवल्या जातात. त्याच्या मदतीने रुग्ण त्यांच्या कमकुवत फुप्फुसांना आणखी मजबूत करण्यास सक्षम आहेत. आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्णांनी या केंद्रांचा लाभ घेतला आहे.
लहान मुले आणि प्रौढ दोघेही या श्वसनाच्या आजाराने अनेकदा ग्रस्त असतात. अशा रुग्णांच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालय मुंबई आणि टीबी रुग्णालय शिवडी येथे पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयात हे केंद्र दोन वर्षांपूर्वी जूनमध्ये सुरू झाले. तर, शिवडी क्षयरोग रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले.
......
या कारणांमुळे प्रकरणांत वाढ
वायू प्रदूषण, तंबाखू सेवन, कबुतरांचा कचरा आदींमुळे फुप्फुसाचे विविध आजार होत आहेत. फुप्फुसात समस्या असल्यास व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह ठप्प होऊ लागतो. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. याशिवाय दमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, टीबी, फुप्फुसाचा कर्करोग अशा अनेक आजारांना ती व्यक्ती बळी पडत आहे.

या युक्त्या शिकवल्या जातात
जे.जे. रुग्णालयाच्या रेस्पिरेटरी मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती मेश्राम यांनी सांगितले की, या केंद्रात फुप्फुसांना बळकट करण्यासाठी श्वासोच्छ्‌वासाचे तंत्र शिकवले जाते, ज्यामध्ये योगामध्ये श्वासोच्छ्‌वासाच्या व्यायामाचाही समावेश आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे, ज्यांची श्वास घेण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, असे त्‍यांनी सांगितले.

पाच हजार टीबी रुग्णांमध्ये सुधारणा
क्षयरोगात रुग्णांच्या फुप्फुसावरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. या रुग्णांचा श्वासोच्छ्‌वास सुधारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शिवडी टीबी रुग्णालयात पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात आले. येथे रुग्णांना श्वासोच्छ्‌वासाचे व्यायाम शिकवले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT