मुंबई

मुंबईत आज पावसाचा अंदाज

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईत रविवारी (ता. १२) व सोमवारी (ता. १३) पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुण्यात पाऊस झाला. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत शनिवारी (ता. ११) सकाळपासून निरभ्र आकाश होते. मात्र सायंकाळी ढग दाटून आल्याचे चित्र होते. याआधीच हवामान खात्याने या विकेंडला मुंबईत पावसाचा इशारा दिला होता. तो इशारा आजही कायम आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या परिणामामुळे वातावरणात बदल झाला असून त्या बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. मुंबई आणि एमएमआर परिसरासह घाट माथ्यावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार घाट माथा परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. हा पाऊस हळूहळू मुंबईकडे सरकण्याची शक्यता आहे. हा पाऊस हलक्या स्वरूपाचा असणार आहे. मुंबईत शनिवारी तापमान नियंत्रणात असल्याचे दिसले. सांताक्रूझ ३३.७, तर कुलाबा ३३.८ कमाल तापमान नोंदले गेले. रविवारी यामध्ये अंशतः वाढ अपेक्षित असून ते सरासरी ३५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT