hsc result 2024 date time esakal
मुंबई

HSC Result: धाकधुक वाढली! उद्या लागणार बारावीचा निकाल, शिक्षण मंडळाकडून निकालपत्र तयार, वेळ जाणून घ्या

Maharashtra Board HSC 12th Result 2024: मंडळाच्या संकेस्थळावरीलच माहिती अधिकृत

CD

पुणे, ता. २० :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २१) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्य मंडळाच्या 'mahresult.nic.in' आणि 'http://hscresult.mkcl.org' या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहता येणार आहे. (hsc result 2024 date time)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सीआयएससीई मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतीक्षा लागली होती ती राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची. आता ही प्रतीक्षा संपली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट आऊट) विद्यार्थ्यांना आणि पालकांना घेता येईल. त्याचप्रमाणे डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

गुण पडताळणीसाठी असा करा अर्ज

ऑनलाईन निकालानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या 'http://verification.mh-hsc.ac.in' या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरता येईल.

पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया

बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन दिलेल्या नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

श्रेणीसुधार योजनेचा असा घ्या लाभ

परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

पुरवणी परीक्षेसाठी २७ मेपासून अर्जाची सुविधा

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २७ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येईल,अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :

- mahresult.nic.in

- http://hscresult.mkcl.org

- www.mahahsscboard.in

- https://results.digilocker.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT