मुंबई

शालेय विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड सारखेच गणवेश

CD

शालेय विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईडसारखेच गणवेश
शाळा व्यवस्थापन, महिला बचत गट पुरवणार
मुंबई, ता. १० : राज्यातील सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाप्रमाणेच गणवेश पुरविले जाणार आहेत. यातील एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर आणि दुसरा स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.
राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच समग्र शिक्षा अभियानाकडून गणवेश आणि त्याच्या वितरण कार्यवाहीसंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी हे सर्व गणवेश मिळतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, गणवेशाच्या एका संचाच्या शिलाईचा दर केवळ शंभर रुपये इतका ठेवण्यात आल्याने इतक्या कमी दरामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील शिलाई कारागीर, महिला बचत गट कारागीर हा संच तयार करून देतील का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.
स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाप्रमाणेच राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांचे गणवेश यंदाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून असतील. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचे हाफ शर्टसाठी कापड असेल. तर, हाफ आणि फुलपँटसाठी गडद निळ्या रंगाचे कापड निश्चित करण्यात आले आहे. मुलींसाठी कमीज आणि सलवार असा गणवेश असेल. यामध्ये कमीजसाठी आकाशी निळ्या रंगाचे कापड, सलवारसाठी गडद निळ्या रंगाचे कापड या गणवेशासाठी पुरविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आवश्यक असलेल्या कापड स्वीकारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या दोन शाळांच्या मुख्याध्यापकांची समिती जाहीर करण्यात आली आहे. ही समिती कापडाचे तागे आणि कापड या संदर्भातील माहिती तपासून त्याचा स्वीकार करेल.
शाळा व्यवस्थापन समितीकडून एक गणवेश तयार केला जाणार आहे. या गणवेशासाठी शिलाई कारागिराची निवड करण्याचे अधिकार समितीला असतील. मात्र, स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
--
एका संचासाठी केवळ १०० रुपये शिलाई
गणवेशाच्या एका संचाची शिलाईची रक्कम ही शंभर रुपये इतक्या दराने ठरविण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरित केली जाणार आहे. या समित्यांवर हा गणवेश तयार करून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता शाळा सुरू होण्यासाठी केवळ नऊ दिवस शिल्लक असताना कापड कधी घेणार आणि ते शिलाई करून कधी मिळेल, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्या आणि शिक्षकांपुढे पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT