मुंबई

आईच्या यकृताने वाचवले बाळाचे प्राण

CD

आईच्या यकृताने वाचवले बाळाचे प्राण

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आपल्या बाळाला वाचवण्यासाठी एका आईने आपल्या यकृताचा तुकडा दान करून त्याला दुसऱ्यांदा नवजीवन दिले आहे. या गरीब कुटुंबाच्या आजारपणाच्या लढाईत केईएम रुग्णालय आणि डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वडाळा येथील रहिवासी ९ वर्षीय अबुतालिब खान यांचे वडील मोहम्मद मुसा खान यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, ‘माझी पत्नी आणि मुलगा उत्तर प्रदेशातील गावात राहत होते. तो ७ वर्षांचा असताना त्याला कावीळ झाली. आम्ही त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले आणि त्याला पुन्हा कावीळ झाली. तेव्हाही तो बरा झाला. अबुतालिबची २०२२ मध्ये केईएम रुग्णालयात दोन वेळा यकृत बायोप्सी करण्यात आली. यामध्ये त्याला विल्सन नावाचा दुर्मीळ आजार असल्याचे समजले. यावेळी डॉक्टरांनी अबुतालिबला दोन महिन्यांच्या कालावधीत यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टरांनी मला किंवा माझ्या पत्नीपैकी एकाला अवयवदान करण्यास सांगितले. त्यानुसार, पत्नीने मुलाला यकृताचा तुकडा दान करण्याचा निर्णय घेतला. अबुतालिबवर शस्त्रक्रिया करणारे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चेतन कंथारिया यांनी सांगितले की, अबुतालिबला विल्सन नावाच्या दुर्मीळ आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे वारंवार काविळीचा त्रास होत होता. यकृत प्रत्यारोपण हाच मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि रोग बरा करण्याचा एकमेव मार्ग उरला होता. यामध्ये आईचे रक्त व मुलाचा रक्त गट जुळला. त्यानंतर आम्ही यशस्वीरित्या थेट यकृत प्रत्यारोपण केले.

..

केईएम रुग्णालयात १० वर्षांनंतर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. आम्हाला आनंद आहे की, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वोत्तम आणि अनुभवी टीमच्या मदतीने आम्ही प्रत्यारोपण करण्यात यशस्वी झालो. आई आणि बाळ दोघेही बरे झाले आहेत.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

विल्सन रोग काय आहे
विल्सन हा एक दुर्मीळ अनुवंशिक आजार आहे, ज्यामध्ये शरीरात अतिरिक्त तांबे जमा होतात, त्याच्या उपचारासाठी रुग्णाला आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावे लागते. विल्सन रोगाच्या काही प्रकरणांमध्ये, मुलांमध्ये यकृत निकामी देखील होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT