मुंबई

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापन दिन साजरा

CD

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्‍या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गेल्या दोन वर्षांत आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये यशस्वीपणे केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या विकासासाठी सकारात्मक दिशेने त्यांच्या क्षमतांचा उपयोग करावा, असे आवाहन केले. जागतिक दर्जाचे महाविद्यालय निर्माण करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. अशोक सुनतकरी यांनी आपल्या प्रास्ताविकात, पीईएसच्या स्थापनेमागील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यांनी घेतलेले कष्ट याविषयी भाष्य केले. सर्व प्राचार्य, इतर महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वी पार पाडण्यासाठी एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT