Mumbai News: केंद्रात मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घ्यावी. ४८ पैकी ४५ खासदार निवडून आणण्यासाठी शिकस्त करावी. कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
मुरूड शहरातील माळी समाज सभागृहात शुक्रवारी (ता.५) आयोजित मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी व्यासपीठावर पेण -सुधागड क्षेत्राचे आमदार रवींद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, ॲड महेश मोहिते, प्रवीण बैकर, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, महेश मानकर, जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अनंत गीते यांनी कोणते काम केलेले नाही, त्यामुळे त्यांना सुनील तटकरेंवर टीका करण्याचा अधिकार नाही. महिला सक्षमीकरणसाठी केंद्र व राज्य सरकार मोठे कार्य करीत असून लवकरच महिलांच्या विकासाच्या आणखी योजना कार्यान्वित होणार, असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.आमदार रवींद्र पाटील म्हणाले, महायुती धर्माचे पालन करणार असून, तटकरे यांच्या विजयासाठी काम करणार आहे. केंद्र सरकारने जल जीवन मिशनअंतर्गत कोट्यवधींचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला देऊ केल्याने ‘हर घर नल से जल’ पोहचले आहे. तटकरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी प्रामाणिक काम करावे, असे आवाहन असे पाटील यांनी केले.
स्थानिक जनतेचे प्रश्न तटकरेंनी समजून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक, राजपुरीतील कोळीवाड्याचे प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी ॲड. महेश मोहिते यांनी तटकरे यांच्याकडे केली. तर भाजपचे ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे यांनी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग-मुरूड मतदारसंघातून १९,९६६ मताची आघाडी होती, या वेळी त्यात तिप्पट वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.