माथेरान (बातमीदार) ः दिवसात माथेरानमध्ये ३४२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २३११ मिमी पाऊस पडला आहे. पावसाचा तडाखा पर्यटकांनाही बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने २००५ ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना होती. बुधवारी परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या तर काही व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद ठेवली होती. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
शारलोट तलावावर आपदा मित्र
माथेरानमध्ये दाखल झालेले पर्यटक शार्लोट तलाव पाहण्यासाठी नक्की जातात. अतिवृष्टीत सुरक्षेचा उपाय म्हणून तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांनी आपदा मित्र यांच्या समवेत नियोजन करून तलाव परिसरात कर्मचारी तैनात केले. इंदिरा गांधीनगरमधील गणेश मंदिराजवळ उन्मळून पडलेले झाड स्थानिकांनी बाजूला करून रस्ता पूर्ववत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.