मुंबई

मातीच्या भांड्यांकडे वाढता कल

CD

डोंबिवली, ता. २६ (बातमीदर) : अलीकडे मातीच्या भांड्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी अन्न शिजवण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात होता. परंतु, काळ बदलल्याने आता वेगवेगळी भांडी वापरण्यात येतात. आधुनिक काळात मातीच्या भांड्यांचे महत्त्व वाढले असून, ती पुन्हा वापरात येऊ लागली आहेत.

आजकाल सर्वांच्या किचनमध्ये नॉनस्टिक भांड्यांचा सर्रास वापर होतो. मातीपासून बनवलेली भांडी ही रुचकर जेवण बनविण्‍यासाठी उत्तम पर्याय आहेत. प्राचीन काळी लोक स्वयंपाक तसेच भोजन वाढण्यासाठी मातीची भांडी वापरत असत. परंतु, काळाच्या ओघात ही परंपरा हरवत चालली आहे. स्वयंपाकघरात ठेवलेल्या मातीच्या भांड्याची जागा स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. बदलत्या जीवनशैलीमुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत आहे. मातीच्या भांड्यात शिजलेले आणि खाल्लेले अन्न आरोग्याच्या दृष्टीने पोषक ठरते.
--------------------------------------
मातीच्या भांड्यात शिजवण्याचे फायदे...
-मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नात आढळते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
-मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने प्रसारित करण्यास मदत करतात. यामुळे अन्नातील पोषक तत्त्वे सुरक्षित राहतात.
-मातीच्या भांड्यात कमी तेलाचा वापर केला जातो. तसेच, मातीच्या भांड्यांमध्ये अन्न रुचकर बनते. या भांड्यांमध्ये शिजवल्‍यामुळे अपचन आणि गॅसची समस्या दूर होते.
-बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता मिळते. अन्नामध्ये असलेले पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. अन्नाचे पीएच मूल्य राखले जाते, ते बऱ्याच रोगांना प्रतिबंधित करते.
------------------------------------------
मातीच्या भांड्यांचा भाव (रुपयांमध्‍ये)
चहाचा कप २० ते २५
मोठी कढई ४००
छोटी कढई १५० ते २००
टोप ५०० ते ६००
तवा ८०
ग्लास ३०
पाण्याची बाटली २००
-----------------------------------------
कोट
माशाचं कालवण बनवण्यासाठी तसेच दही लावण्यासाठी मातीचे भांडे हे उत्तम आहे. उन्‍हाळ्यामध्‍ये अशा भांड्यांचा स्‍वयंपाकघरात सर्रासपणे वापर केला जातो.
- विद्या आंबेकर, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT