मुंबई

जिल्‍हा परिषद सदस्यांना विश्रांतीसाठी कक्ष मिळावा!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : जिल्‍हा परिषदेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने अध्यक्षांसह उपाध्यक्ष व सभापतींना कार्यालये खाली करावी लागली आहे. जिल्हा परिषद सदस्य हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुख्यालयी जनतेची कामे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी येत आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जिल्‍हा परिषद सदस्यांसाठी विश्रांती कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे केली.
ठाणे जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत १४ जानेवारी २०२३ पासून संपुष्टात आली आहे. त्यामुळे अध्यक्षांसह उपाध्यक्ष, पशु संवर्धन सभापती, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य सभापती, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण समिती सभापती या पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून कार्यालयांवरील फलक काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुख्यालयी कामे व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी येत आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी एक विश्रांती कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे केली. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT