मुंबई

देहर्जे प्रकल्पाविरोधात संघर्ष समितीचे आंदोलन

CD

विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यात देहर्जे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये साखरे, खुडेद, जांभा या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ४०२ कुटुंबे बाधित होणार आहेत. या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन न करता प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाच्या आवारामध्ये आंदोलन केले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देहर्जे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. याबाबत अनेकदा आंदोलन, उपोषणे केली असतानाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज जोपर्यंत योग्य पुनर्वसन, योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम बंद करावे, अशी मागणी करत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. या वेळी या प्रकल्पाच्या आवारामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहर्जे प्रकल्पामध्ये साखरे, खुडेद, जांभा या ग्रामपंचायतीतील ४०२ कुटुंबाचा बाधित होणार असून या बाधितांना लवकरात लवकर योग्य पुनर्वसन व मोबदला द्यावा; अन्यथा हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT