मुंबई

पिंपळास सर्व्हिसरोडसाठी अधिकाऱ्यांना घेराव

CD

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर आठपदरी रस्त्याचे काम चालू असून या महामार्गावरील पिंपळास फाट्यावर नेहमीच अपघात होत असतात. हा मुख्य रस्ता असल्यामुळे परिसरातील पिंपळास, कोन, कल्याण, उल्हासनगर, पिंपळनेर, वेहेळे, भाटाळे व परिसरातील लोकांना दळणवळणासाठी या मार्गावरून ये-जा करावी लागते. तसेच शाळेतील विद्यार्थीदेखील याच रस्त्यावरून दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे या मार्गावरील पिंपळास गावातील नागरिकांना नियमित ये-जा करण्यासाठी अंडरपास सर्व्हिस रोडची गरज असल्याचे सांगत पिंपळास गावातील ग्रामस्थांनी रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
कल्याण रोडवरील रांजणोली ते ठाणे खारेगाव टोलनाका या मार्गावरील गावांमधील अनेक ग्रामस्थ या मार्गावरील अपघातात मृत झाले आहेत. याची दाखल महामार्ग रस्ते विकास महामंडळाने घेतली नाही, असा आरोप ग्रामीण नागरिकांनी केला आहे. पिंपळास फाट्यावर अनेक जणांचे बळी गेले असुन अजुन शासन किती जणांचा बळी जाण्याची वाट बघतोय? असा सवाल करीत ग्रामपंचायत पिंपळासचे सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी व पिंपळास ग्रामस्थ यांनी सामाजिक कार्यकर्ते करसन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते महामार्ग विभागाचे अभियंता प्रशांत शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना घेराव घालून माहिती घेतली.

-----------
वीस वर्षांपासूनच्या मागणीकडे दुर्लक्ष
मुंबई-नाशिक महामार्ग झाल्यापासून पिंपळास फाट्यावर अंडरपास सर्व्हिस रोड करून मिळावा, अशी मागणी पिंपळास गावातील ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून करीत आहेत; परंतु प्रशासन आणि ठेकेदारांनी केवळ आश्वासन देऊन ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली. पिंपळास आणि परिसरातील गावातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली असून त्याबरोबर त्या गावातील दुचाकीसह इतर वाहनांची संख्या वाढली आहे. या मार्गावर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने भरधाव वाहने वेगाने जात असतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन नागरिकांना व वाहनचालकांना रस्ता ओलांडावा लागतो.

---------------
आंदोलनाचा इशारा
पिंपळास ग्रामस्थांनी अभियंता शेंडे यांना जाब विचारत पिंपळास, ओवळी, सरवली व इतर गावांना सर्व्हिस रोड व अंडरपास (मोरी) बनवण्यात याव्यात; अन्यथा लवकरच सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामपंचायतींना सोबत घेऊन हायवे बंद आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी पिंपळास ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच छत्रपती कोळी, सुनील ठाणगे, अंकुश भोईर, जगदीश पताळे, शरद नागावकर, हर्षल पाटील, सतीश पाटील, हिरामण म्हस्के, किशोर मढवी, वीरेंद्र पाटील, पिंपळास गावातील ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

--------------
मुंबई-नाशिक महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून लवकरच माजिवडा ते वडपेपर्यंत अंडरपास (मोरी) बांधण्यात येईल.
- प्रशांत शेंडे, अभियंता, महामार्ग रस्ते विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT