मुंबई

दिव्यांगासाठी पावणे दोन कोटींच्या योजना

CD

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर क्षेत्रात राहणाऱ्‍या दिव्यांग व्यक्तींसाठी महापालिकेने चालू आर्थिक वर्षात एकूण पावणेदोन कोटी रुपयांच्या योजना राबवल्या आहेत. यात प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक मदत, स्वयंरोजगार, सर्व शिक्षा अभियान, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, उपकरणांचा पुरवठा आदी योजनांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आणखी काही दिव्यांग आर्थिक मदत मिळण्यापासून वंचित राहिले आहेत; पण महापालिकेने तरतूद केलेला निधी संपुष्टात आला असल्यामुळे प्रशासनाला त्यांच्यासाठी निधीचे पुनर्विनियोजन करावे लागणार आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सोळाशेहून अधिक दिव्यांग आहेत. त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महापालिकेने चालु आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पावणे दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या निधीतून गेल्या वर्षभरात १११९ दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत (वार्षिक पेन्शन) योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी ६० लाख २४ हजार रुपये खर्च झाले आहेत. याव्यतिरिक्त दोन लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, सर्व शिक्षा अभियान योजनेतून सहा विद्यार्थ्यांना लाभ, ३६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ, सात विद्यार्थ्यांना कानाचे यंत्र, १४ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, त्याच बरोबर दहावी व बारावीत शिकणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांचा गुणगौरव अशा १२५० दिव्यांग व्यक्तींना महापालिकेने विविध योजनांचा लाभ दिला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेला सर्व १ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी खर्च केला आहे. त्यानंतरही सुमारे साडेचारशे दिव्यांग व्यक्तींना पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे बाकी राहिले आहे.
...
पुनर्विनियोजन केले जाणार
अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी संपुष्टात आला असल्यामुळे महापालिकेच्या इतर विभागात शिल्लक राहिलेला निधी या योजनांसाठी वळवून त्याचे पुनर्विनियोजन केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या समाजकल्याण योजना विभागाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT