मुंबई

७ ग्रॅमपेक्षा कमी लोह असलेल्या महिला उपचारांवर

CD

रक्‍तक्षय मुक्‍तीसाठी वाटचाल
चार वर्षांत १६ हजारांहून अधिक महिलांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मुंबईसारख्या मोठ्या शहरातील महिला आजही रक्‍तक्षय अर्थात ॲनेमियाग्रस्त असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पालिकेने दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांत १६ हजारांहून अधिक महिला ॲनिमियाग्रस्तांची नोंद झाली आहे.
रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया ही समस्‍या बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया व गर्भवती व स्तनदा मातांमध्ये आढळते. या समस्येवर मात करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ॲनिमिया मुक्त भारत अभियान हा उपक्रम विकसित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत पालिका विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक सेवा देत आहेत. तसेच सर्व गर्भवती महिला आणि प्रजननक्षम गटातील सर्व मुलांना घरोघरी जाऊन सेवा दिली जात आहे. ॲनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत पुरवण्यात आलेली औषधे, विविध वयोगटातील बालकांना गुलाबी आणि निळ्या रंगाच्या गोळ्या देण्यात येतात. तसेच अंगणवाडीमध्ये पोषण माह व सप्ताह आयोजित केले जातात व त्यामध्ये महिलांना व बालकांना पोषणाचे महत्त्व, आरोग्यविषयक चर्चा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सत्रांची माहिती दिली जाते. रक्‍तक्षयग्रस्‍त महिलांना आयएफए औषधे व इतर उपचार, मार्गदर्शन देण्यात येत असल्‍याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

रक्‍तक्षयाचे दुष्परिणाम
शारीरिक वाढ योग्य रीतीने न होणे
शारीरिक कार्यक्षमता कमी असणे
बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होणे
संसर्गजन्य रोगास बळी पडणे
...........................................
उपाययोजना-
तपासणीत रक्तक्षय आढळल्यास तातडीने उपचार
सहा महिने ते ५९ महिन्यांच्या बालकांना लोहयुक्त सिरप
पाच ते १० वर्षांच्या विद्यार्थ्यांना लोहयुक्त गुलाबी गोळ्या
११ ते १९ वर्षांतील मुलांना लोहयुक्त निळ्या गोळ्या
२० ते ४९ वर्षातील महिलांना लोहयुक्त लाल गोळ्या
........................................................
३ वर्षांची आकडेवारी-
वर्ष रक्तशय आढळलेल्या महिलांची संख्या (७ ग्राम पेक्षा कमी)
२०१९-२० ५०८२
२०२०-२१ ५३८२
२०२१-२२ ३४१८
२०२२-२३ २४२५
........................................
कारणे
जेवणाच्या सवयी, लोहाची कमतरता, कमकुवतपणा, अकाली प्रसूती
.........................................
रक्‍तक्षयाचे प्रकार -
१. पौष्टिक तत्त्वांच्या कमतरतेमुळे
(अ) लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा रक्‍तक्षय
(ब) जीवनसत्त्व ब व फोलिक ॲसिड कमतरतेमुळे होणारा रक्‍तक्षय
२. हाडामधील मूळ रक्तपेशींच्या अभावामुळे होणारा रक्‍तक्षय
३. रक्तपेशींच्या विघटनामुळे होणारा रक्‍तक्षय
४. जुनाट आजारांमुळे होणारा रक्‍तक्षय
.........................................
लक्षणे -
अशक्तपणा, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे, पायात गोळे येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, त्वचा पांढरी पडणे.
...........................................
उपाय -
आहारातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थांना पसंती द्या.
‘क’ जीवनसत्त्वाचे आहारातील प्रमाण वाढवा.
शक्य असल्यास मासे, चिकन, मटण यांचा आहारात समावेश करा.
अतिप्रमाणात चहा आणि कॉफी घेणे टाळावे, तसेच ही दोन्ही पेये जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर घेऊ नयेत.
..................

अंगणवाडीमध्ये पोषण माह व सप्ताह आयोजित केले जातात. यामध्ये महिलांना व बालकांना पोषणाचे महत्त्व, आरोग्यविषयक चर्चा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सत्रांची माहिती दिली जाते. रक्‍तक्षयग्रस्‍त महिलांना आयएफए औषधे व इतर उपचार, मार्गदर्शन देण्यात येते.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

महिलांनी काळजी द्यावी
गर्भवती मातेला रक्‍तक्षय झाल्याने अनेकदा बाळही कमकुवत जन्माला येते. भारतातील स्त्रिया प्रामुख्याने शाकाहार घेतात, ज्यात योग्य प्रमाणात लोह असतेच असे नाही. बाळाच्या जन्मापूर्वीच त्यांचे लोहस्तर परीक्षण केले जाते आणि योग्य पातळीवर आणले जाते. बहुतेक स्त्रिया, आहारात आणि जे केवळ शाकाहारी जेवण घेतात, त्यांच्यात कमी प्रमाणात हिमोग्लोबिन दिसून येते. हे सामान्यत: कमी आहारामुळे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या स्त्रियांमध्ये किंवा सर्वाधिक डायट करणाऱ्या महिलांमध्ये आढळून येते. तसेच मासिक पाळीच्या दरम्यान झालेल्या रक्ताची कमतरता, योग्य लोह आणि व्हिटामिन सी च्या अधिक वापरामुळे ही कमतरता भरून निघते. तसे झाले नाही तर महिलांना अशक्तपणा होऊ शकतो. ही परिस्थिती भारतात सर्वसामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT