मुंबई

वाढत्या उन्हामुळे खिशाला भुर्दंड

CD

नवीन पनवेल, ता. १० (वार्ताहर)ः एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाढलेल्या उष्णतेमुळे पनवेलकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे बाजारात कुलर, फ्रीज व एसीची मागणी वाढली आहे. मात्र, या वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ग्राहकांवर नवीन वस्तू खरेदी करताना जादा पैसे मोजण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्यात शहरात डेझर्ट कुलर व ब्रँडेड कुलर हे दोन प्रकार उपलब्ध असतात. डेझर्ट कुलर स्थानिक भागात तयार होतो. त्यामध्ये कॉपरचे दर वाढले आहेत. तसेच लोखंडाचे दरही वाढले आहेत. त्याचा फटका बाजाराला बसला आहे. कुलरमध्ये असलेल्या मोटारीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच मजुरीचे दरदेखील वाढल्याने किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ब्रँडेड कुलरच्या बाबतीतही हीच स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. एसीच्या बाबतीतही काही वेगळी परिस्थिती नाही. एसीमध्ये काही पार्ट परदेशातून तयार होऊन येतात. त्याचा उपयोग केला जातो. त्याचेही पार्ट महाग झाल्याने अडचण झाली आहे. एसीच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. फ्रीजलाही महागाईचा फटका बसला आहे. कॉम्प्रेसरच्या किमतीत वाढ झाली आहे. फ्रीजचा समोरील भागाचा दरवाजा देखील परदेशातून येतो. त्यामुळे फ्रीज निर्मितीसाठी कच्च्या मालावर अवलंबून राहावे लागत आहे, पण उन्हाळ्यात या वस्तूंचा वापर जास्त होत असल्याने किमतीत वाढ होत आहे.
------------------------------
कोरोनाच्या काळानंतर अजूनही बाजार सावरलेला नाही. सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. मुळातच चीनसोबत बिघडलेले संबंध, तसेच इंधन दरवाढीचे आता परिणाम दिसत आहेत. सध्या उकाडा वाढला असला तरी खरेदीसाठी ग्राहकांचा हवातसा उत्साह नाही.
- महेंद्र पुरोहित, विक्रेता, कळंबोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT