मुंबई

प्रतिकार करणाऱ्यावर लुटारूंचा हल्ला

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लुटण्यासाठी आलेल्या दोघा लुटारूंना प्रतिकार करणाऱ्या तरुणावर दोघा लुटारूंनी धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना सानपाडा सेक्टर-८ मध्ये घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेरूळ येथे राहणारा अनिल जयस्वाल (३२) हा एपीएमसी मार्केटमध्ये मनी ट्रान्सफरचे काम करणाऱ्या राजकुमार जयस्वालकडे काम करत होता. मनी ट्रान्सफरद्वारे जमा झालेली रोख रक्कम दरदिवशी मालक राजकुमार याच्या नेरूळ येथील घरी नेऊन देत होता. शनिवारी (ता. ८) रात्रीदेखील जमा झालेली दोन लाखांची रोख रक्कम घेऊन अनिल रात्री सव्वाअकराच्या सुमारास मोटरसायकलवरून नेरूळ येथे निघाला होता. या वेळी सानपाडा सेक्टर- ६ मध्ये आला असताना दोघा लुटारूंनी त्याच्याजवळ असलेली रोख रकमेची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र अनिलने त्यांना प्रतिकार केल्याने एका लुटारूने धारदार हत्याराने अनिलवर वार केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT