मुंबई

मुद्रांक विक्रेत्यांचा बेमुदत संप मागे

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुद्रांक वितरणाबाबत फक्त मुंबईपुरते मर्यादित आदेश जारी केल्याच्या विरोधात मुंबई मुद्रांक विक्रेते संघटनेने ३ एप्रिलपासून संप पुकारला होता. आज मंत्रालयात ब्रिटिशकालीन कायदा मुंबई मुद्रांकमधील तरतुदींत बदल करण्याची मागणी करत मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत सुरू असलेला संप मागे घेतला आहे. मंत्रालयात अपर मुख्य सचिव नितीन करीर आणि उपसचिव सत्यनारायण बजाज याना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई मुद्रांक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी एक पत्रक जारी करत संप मागे घेत असल्याचे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मागणीची दखल घेऊन तीन पैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल मुंबई मुद्रांक विक्रेते संघटनेने सरकारचे आभार मानले. मुद्रांक विक्रेत्यांचा तिसरा मुद्दा महत्त्वाचा असून ब्रिटिशकालीन कायदा बदलण्याची आवश्यकता आहे. खासगी व्यक्तीस मुद्रांक पेपर वितरित करताना मुद्रांक विक्री नोंदवहीमध्ये (नियम १३ नुसार) तसेच मुद्रांक पेपरवर (नियम १५ नुसार) अनुसूची ‘घ’ मधील अनुक्रमांक तीनमधील तरतुदीनुसार त्याची किंवा त्याच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी/ अंगठ्याची निशाणी मुद्रांक विक्रेत्याने त्याच्या समक्ष घेणे आवश्यक आहे, असा बदल करण्याची मागणी संघटनेची असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT