मुंबई

‘टिपटॉप’चे संचालक रोहित शहा यांचे निधन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक रोहित शहा यांचे शनिवारी निधन झाले. टिप-टॉप मिठाईवाला, टिप-टॉप प्लाझा आणि जीन्स जंक्शन या कंपनीचे ते संचालक होते. शनिवारी सकाळी सहा वाजण्‍याच्या सुमारास मुलुंड येथील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मुलुंडमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, मुलगा कार्तिक, जयदीप, सून डिंपल, ऊर्वी आणि नात जिनेशा आहेत. रोहित शहा यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता; तर त्यांचा चेहरा सतत हसतमुख होता. ते सढळ हाताने सर्वांना मदत करत असल्‍याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
रोहित शहा यांनी १९६७ मध्ये ठाण्यातून व्यवसायाला सुरुवात केली. १९७५ मध्ये त्यांनी जीन्स जंक्शन हे कपड्यांचे दुकान सुरू केले. त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये टिप-टॉप मिठाई विक्रीचे ‘टिप-टॉप मिठाईवाला’ हे दुकान सुरू केले. २००४ मध्ये त्यांनी तीन हात नाका येथे ‘हॉटेल टिप-टॉप प्लाझा’ सुरू केले. अतिशय प्रशस्त अशा टिप-टॉप प्लाझामध्ये राजकीय पक्षांच्या बैठका, लग्नसमारंभांचे आयोजन केले जाते. त्यामुळे हॉटेल टिप-टॉप प्लाझाची ठाणे शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT