मुंबई

जप्त फळे, भाजीपाल्यांचे संस्थांना वाटप

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे स्थानक परिसरातील पदपथांवर हातपाय पसरलेल्या फेरीवाल्यावर पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. नेताजी सुभाषचंद्र पथ ते कोपीनेश्वर मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर ही कारवाई जोरात सुरू आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे जप्त केली जात आहेत. हा मुद्देमाल नाशवंत असल्याने ते वाया न जाता गरजूंच्या तोंडी लागावे यासाठी त्याचे वाटप स्वयंसेवी संस्थांना करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गेला आठवडाभर सकाळी साडेसहा वाजल्यापासून दैनंदिन कारवाईची मोहीम सुरू आहे. सुभाष पथ येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत भाजी मार्केटवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान भाजीपाला, फळे जप्त करण्यात आली आहे. सर्व भाजीपाला तसेच फळे सेवाभावी संस्थांना तसेच छत्रपती शिवाजी कळवा हॉस्पिटल येथील शिव प्रेरणा मंडळ, वर्तक नगर येथील दिव्यप्रभा महिला अनाथालय, माँ निकेतन महिला कामगार संस्था, नौपाडा येथील वुमेन्स वेल्फेअर फाऊंडेशन, नौपाडा कोपरी प्रभागतील बेघर संस्था, येऊर येथील श्री सदगुरू सेवा मंदिर ट्रस्ट यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोंडी सुटण्यास मदत
ठाणे स्थानक व परिसरालगत असलेले सर्व रस्ते व पदपथ हे वाहतुकीसाठी कायमस्वरुपी मोकळे असणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून वारंवार जनजागृती करुनदेखील अतिक्रमण होत आहे. ही मोहीम महापालिकेबरोबरच पोलिस विभागामार्फत सातत्याने सुरू आहे. त्यामुळे आता हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा मिळत आहे. पण या मोहिमेमध्ये ठाणेकरांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. रस्ता वा फूटपाथवर उभ्या राहत असलेल्या फेरीवाल्यांवर नागरिकांकडून खरेदी करू नये, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT