मुंबई

ऑलिम्पिक पदक विजेतीसह माजी पोलिस अटकेत

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (अमली पदार्थ विरोधी पथक) मुंबई पथकाने गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला असून २ विदेशी नागरिकांसह ३ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता रशियन जलतरणपटू आणि माजी रशियन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांकडून अमली पदार्थांसह चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव एस. वर्गानोवा असून १९८० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. दुसरा रशियन नागरिक आंद्रे हा रशियन पोलिसातील माजी अधिकारी आहे. रशियन नागरिकांसह आकाश नावाच्या भारतीय नागरिकाला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत एलएसडीचे ८८ ब्लॉट्स, ८.८ ग्रॅम कोकेन, २४२.५ ग्रॅम चरस, १.४४० किलो हायड्रोफोनिक गांजा, १६.४९ ग्रॅम हॅश ऑइल, ४१० ग्रॅम हॅश केक आणि ४.८८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

आंद्रे हा गोव्यात अनेक दिवसांपासून अमली पदार्थांचा व्यापार चालवत होता. आपले जाळे पसरवण्यासाठी तो अनेक शहरांमध्ये जाऊन तस्करांचे नेटवर्क चालवत होता. एनसीबीच्या मुंबई पथकाने दोन आठवडे पाळत ठेवली होती. गोव्यातील आरंबोल आणि आसपासच्या भागात रशियन ड्रग टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT