मुंबई

शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश

CD

बीएलओच्या कामातून सुटका!
शिक्षण क्रांती, शिक्षक परिषदेसह शिक्षक सेनेच्या पाठपुराव्याला यश
मुंबई, ता. १ ः मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५० वर्षांखालील शिक्षकांना ऐन उन्हाळी सुट्टीत बीएलओचे काम देण्यात आले होते. त्याविरोधात राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केलेल्‍या पाठपुराव्यानंतर शिक्षकांची या कामातून सुटका झाली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे. १४ जूनपर्यंत शाळा बंद असणार असून या सुट्टीत शिक्षकांनीही बाहेरगावी जाण्याची योजना आखली आहे; मात्र या सुट्टीदरम्यानच अतिरिक्त किंवा कार्यरत असा भेद न करता सरसकट सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामांना जुंपण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

यशस्‍वी चर्चा
मुंबई उपनगर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून शनिवारी सुमारे ६०० शिक्षकांच्या बीएलओ नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले होते. याप्रकरणी शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची भेट घेत उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना बीएलओची कामे न देण्याची मागणी केली. तसेच शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी वेळोवेळी शिक्षकांच्या बीएलओ नियुक्तीचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT