मुंबई

रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मनस्ताप

CD

घणसोली, ता. १ (बातमीदार)ः रेल्वे स्थानकासमोर रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात दुहेरी रिक्षा पार्किंग होत असल्याने दररोज कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांवर कोंडीतूनच मार्गस्थ होण्याची वेळ आली आहे.
घणसोली रेल्वे स्थानकाच्या समोर प्रवाशांची मोठी रेलचेल सुरू असते. रेल्वे स्थानकात जाणारे-येणारे प्रवासी तसेच वाहनचालकांमुळे वारंवार गजबजलेला परिसर पाहायला मिळतो; मात्र या परिसरात बेकायदा रिक्षा स्टँड सुरू करण्यात आला असून रात्रीच्या वेळेस येथे दुहेरी पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना चालण्यासाठी जागा नसल्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे; तर या रिक्षांमुळे महापालिकेच्या बसला वळण घेताना अडचणी येत असल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे काही सेकंदांचा रस्ता पार करण्यासाठी अनेक मिनिटे कोंडीमध्ये वाहनचालकांना उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे या दुहेरी पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत.
----------------------------------------
अल्पवयीन रिक्षाचालकांचा वावर
अनेक रिक्षाचालकांकडे परवाना, गणवेश नसतानाही ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. तसेच अनेकदा काही रिक्षाचालक नशा करून प्रवाशांना नाहक त्रास देत आहेत; तर रात्रीच्या वेळी अल्पवयीन रिक्षाचालक असल्याने वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.
-------------------------------------------
घणसोली विभागात वारंवार वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. यासाठी विशेष पथकाचीदेखील नियुक्ती केली आहे; मात्र तरीही रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार सुरू आहेत.
- विश्वास भिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे वाहतूक विभाग
-----------------------------------
घणसोली रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांमुळे अगोदरच वाहतूक कोंडी असते. त्यात मनमानी पद्धतीने दुहेरी पार्किंग करून रिक्षाचालक प्रवाशांना वेठीस धरत आहेत.
- मनोज बोबडे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT