मुंबई

महामार्गावरील जलकोंडीवर तोडगा

CD

खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघर टेकडीवरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील कोपरा भुयारी मार्गालगतचा परिसर जलमय होत असतो. या महामार्गावरील गटरांची स्वच्छता होत नसल्याने अनेक वेळा हा प्रकार पाहावयास मिळतो; परंतु यंदा पावसाळ्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छतेची कामे सुरू केली असल्याने महामार्गावरील जलकोंडी टळणार आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी ते खारघर टोलनाकादरम्यान गटारात साचलेली माती, प्लास्टिकमुळे, गटारे पावसाळ्यात तुंबू नये म्हणून छोटी-मोठी गटारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जातात. दरम्यान, खारघर डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास सेक्टर बारा आणि अकरा मार्गे खाडीत जाणारा नाला फुटून कोपरा भुयारी मार्गकडून टोल नाका रस्त्यावर अनेक वेळा पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात कोपरा भुयारी परिसरात पाणी तुंबू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारातील माती, प्लास्टिक काढून पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी महामार्गावर होणारी जलकोंडी टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------------------------------------------------
तात्पुरत्या पुलामुळे धोका
खारघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान आलेल्या श्री सदस्यांचा प्रवास निर्विघ्न व्हावा, यासाठी खारघर कोपरा पुलालगत एक दिवसासाठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. हा पूर हटवण्याला खारघर फोरमने विरोध केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर खारघर परिसरात जास्त पाऊस झाल्यास तात्पुरत्या पुलामुळे पाणी तुंबण्याचा धोका आहे. या पुलामुळे खारघर डोंगराचे पाणी सायन-पनवेल महामार्गावर येण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांना आहे.
------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT