मुंबई

सनदी लेखापालांकडून कायद्याचे उल्लंघन

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : गृहनिर्माण प्रकल्पांचे दैनंदिन व्यवहार आणि वैधानिक लेखापरीक्षण एकाच सनदी लेखपालाने केल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. याविरोधात महारेराने कठोर पाऊल उचलत भारतीय सनदी लेखापाल या संस्थेला पत्र लिहून अशा सनदी लेखपालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यात सनदी लेखापालांना देण्यात येणाऱ्या यूडीआयएन क्रमांकाचाही अग्राह्य पद्धतीने वापर झाल्याचे महारेराचे म्हणणे आहे.
या अनियमिततेबाबत संबंधित सनदी लेखापालांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यासोबतच बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या या सनदी लेखापालांची यथोचित नोंद घ्यावी, यासाठी महारेराने अखिल भारतीय सनदी लेखापाल संस्था या शिखर संस्थेला पत्र पाठवले आहे. तसेच आवश्यक असल्यास या सनदी लेखापालांसाठी स्थावर संपदा अधिनियमाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण हाती घ्यावे, अशी सूचनाही महारेराने या पत्रातून केली आहे.
...
कायद्यात नेमके काय?
विकसकाने प्रकल्पाचे काम करण्यासाठी त्या त्या प्रकल्पाच्या गुंतवणुकीपोटी ग्राहकांकडून आलेल्या पैशांपैकी ७० टक्के रक्कम रेरा नोंदणी क्रमांकनिहाय स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवायला हवी. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर हे पैसे काढताना प्रकल्प पूर्ततेची टक्केवारी, अंदाजे खर्च प्रकल्पाचे अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात बँकेतून पैसे काढताना प्रकल्पाच्या सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले प्रपत्र सादर करावे लागते. याचा तपशील दर तीन महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक आहे. विकसकाला याशिवाय वर्षातून एकदा आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांत प्रपत्र पाचमध्ये वैधानिक लेखापरीक्षण अहवाल अद्ययावत करणे बंधनकारक आहे. महारेराने या दोन्हींसाठी स्वतंत्र सनदी लेखापाल असणे बंधनकारक केलेले आहे.
...
अनियमितता कशी?
विविध प्रपत्र महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी पाठवलेल्या नोटिशींच्या अनुषंगाने जी माहिती महारेराकडे येत आहे, त्यातून ही अनियमितता महारेराच्या निदर्शनास आली. यामुळे स्वतंत्र सनदी लेखापालाकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मिळण्याच्या अपेक्षेलाच हरताळ फासला गेल्याचे महारेराचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT