Thane Municipal Corporation  sakal
मुंबई

Property Tax : ठाणे महापालिकेने केली ४० दिवसांत १०० कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली

यंदाच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ठाणेकरांना चालू आर्थिक वर्षाच्या १ तारखेपासूनच मालमत्ता बिले अदा करण्यास सुरुवात केली.

सकाळ वृत्तसेवा

यंदाच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ठाणेकरांना चालू आर्थिक वर्षाच्या १ तारखेपासूनच मालमत्ता बिले अदा करण्यास सुरुवात केली.

ठाणे - यंदाच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ठाणेकरांना चालू आर्थिक वर्षाच्या १ तारखेपासूनच मालमत्ता बिले अदा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वेळेत बिले नागरिकांच्या हाती पडल्यामुळे मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसांत १०० कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली करण्यात आली आहे. यामुळे ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने चालू (२०२३-२४) आर्थिक वर्षाची देयके १ एप्रिलपासून करदात्यांना पाठविण्यास सुरुवात केली. मोबाईलवर पाठवलेल्या या संदेशाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी सुमारे १००० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे.

गेल्या वर्षी १० मेपर्यंत ११.४६ कोटी रुपयांचा कर भरणा झाला होता. या वर्षी ही रक्कम १००.८५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा पट वाढ झाली आहे. तोच कल मालमत्ताधारकांच्या संख्येबाबतही आहे. गेल्या वर्षी या काळापर्यंत ६४१५ मालमत्ताधारकांनी कर भरला होता. ती संख्या या वेळी ७४ हजार ९०८ एवढी आहे. करदात्यांपैकी ५१.२५ टक्के नागरिकांनी करभरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे; तर ३३ टक्के करदात्यांनी धनादेशाद्वारे करभरणा केला आहे.

रोख रकमेने करभरणा करण्याचे प्रमाण आता ८.८० टक्क्यांवर आले आहे. तसेच, सर्वाधिक ३६.१९ कोटी रुपयांचा कर भरणा माजिवडा-मानपाडा क्षेत्रात झाला आहे; तर सर्वात कमी २.५४ कोटी रुपयांचा करभरणा मुंब्रा भागात आहे. ऑनलाईन करभरणा करण्यासाठी प्रोस्ताहन देतानाच ऑनलाईन कर भरणारे आणि ऑफलाईन करभरणा करणारे यांच्याकडून प्रक्रियेबद्दलचा प्रतिसाद नोंदवून घ्यावा म्हणजे आपल्या यंत्रणेत तसे बदल करता येतील, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांना दिल्या आहेत.

असा करता येईल भरणा

मालमत्ताधारकांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत देयके पाठवली जात होती. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देयक ऑनलाईन भरण्याची लिंक एसएमएसद्वारे उपलब्ध झाली. त्यामुळे त्याच दिवसापासून करदात्यांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली. करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरून उपलब्ध करून घेऊ शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआयद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.

करवसुलीसाठी उपाययोजना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी - सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल, तर त्याची रक्कम किती आहे. मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महापालिकेच्या वेबसाईटद्वारे मिळू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वा. या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल. त्याशिवाय, ऑनलाईन करभरणा सुविधाही कार्यरत आहे.

सवलत

पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जूनपर्यंत १० टक्के, ३० जूनपर्यंत ४ टक्के, ३१ जुलैपर्यंत ३ टक्के आणि ३१ ऑगस्टपर्यंत करभरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय करभरणा (कोटी रुपयांमध्ये)

माजिवडा-मानपाडा -३६.१९

वर्तकनगर - २५.५२

नौपाडा-कोपरी - १०.८५

उथळसर - ८.९६

लोकमान्य नगर-सावरकर नगर - ४.०५

कळवा - ३.२५

दिवा - ३.५६

वागळे इस्टेट - २.७२

मुंब्रा - २.५४

मुख्यालय - २.९९

असा झाला करभरणा

ऑनलाईन - ५१.६९ कोटी

धनादेश - ३३.८० कोटी

रोख - ८.८७ कोटी

डीडी - ६.३७ कोटी

कार्ट पेमेंट - ०.१२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT