मुंबई

रस्ते कामांत १६ टक्क्यांचे वाटप

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा, यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांचे मस्टिक, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, यूटीडब्ल्यूटीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत. ही रस्त्यांची कामे मिळावीत, यासाठी १६ टक्क्यांचे वाटप झाल्याचा गंभीर आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तसेच रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्तेदुरुस्तीसाठी तब्बल ६०५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी २१४ कोटी; तर दुसऱ्या टप्प्यासाठी ३९१ कोटींची तरतूद करण्यात आली असून दोन्ही टप्प्यांची कामे ही एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कामांची ३१ मे ही शेवटची मुदत होती; मात्र ही मुदतदेखील संपली असून अजूनही रस्त्यांची कामे ही अर्धवटच असल्याचे समोर आले आहे. आता रस्त्यांच्या कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मिळावी यासाठी निविदा भरताना १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरण्यात आल्या आहेत. ही कामे मिळावीत, यासाठी १६ टक्क्यांचेही वाटप झाले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्चचिन्ह उपस्थित करत या सर्व कामांचे छायाचित्र काढण्यात आले असून कामांची पोलखोलदेखील लवकरच करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
.................
...तर पालिकेवर हल्लाबोल
शहरातील सुरू असलेल्या नालेसफाईबाबाबत तसेच शौचालयांच्या दुरवस्थेबाबत ठाणे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागातील काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी शहरातील नालेसफाईची तसेच शौचालयांची पाहणी केली असून नालेसफाई केवळ ५० टक्के; तर शौचालयांचीही अत्यंत खराब अवस्था असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असून परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही, तर ठाणे महापालिकेवर हल्ला बोल आणि टमरेल आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT