घणसोली, ता. १४ (बातमीदार)ः घणसोली विभागात असलेल्या एएसपी शाळेकडून क्यूआर आणि अॅप घेण्यासाठी वर्षाला ९०० रुपये आकारण्यात येणार होते. तसेच ॲपसाठी पैसे भरले नाही तर विद्यार्थांना शाळेतून पुस्तके दिली जात नव्हती. त्यामुळे ॲप घेण्यासाठी शाळेकडून होत असलेल्या सक्तीविरोधात पालिकेकडे तक्रार केल्यानंतर अखेर ॲपसाठी शाळेने केलेली सक्ती रद्द झाली आहे.
घणसोलीतील एएसपी शाळा व्यवस्थापनाकडून क्यूआर बुक्स हे अॅप घेण्यासाठी सक्ती होत होती. शाळेकडून हे ॲप नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले होते. यासाठी पालकांना शाळेमध्ये अतिरिक्त ९०० रुपये भरावे लागणार होते. या अॅपच्या माध्यमातून पालकांसोबत आवश्यक तपशील, कार्यक्रम, परिपत्रके, सूचना, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती इत्यादीसाठी संपर्क साधण्यात येणार होता. पण नवी मुंबई महापालिकेमार्फत शाळांना कोणत्याही प्रकारच्या अॅपची सक्ती नसताना विद्यार्थ्यांवर सक्ती केली जात असल्याने काही पालकांनी याबाबत पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पालिकेने याबाबत शाळेकडे विचारणा केली असता अशी कोणतीही सक्ती केली जात नसल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
----------------------------------------------
अॅप संर्दभात शाळेने कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. तसेच कोणावरही सक्ती करण्यात आलेली नाही. तसे परिपत्रकही शाळेकडून लावण्यात आले आहे.
- सुरेखा पिसाळ, मुख्याध्यापिका, एएसपी शाळा
-------------------------------------------
कोणत्याही शाळेकडून वस्तू विकत घेण्याची सक्ती केली जात असेल तर अशा शाळांची तक्रार पालकांनी लेखी स्वरूपात शिक्षण विभागाकडे द्यावी, असे परिपत्रक महापालिकेने जाहीर केले पाहिजे. जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.
- दिनेश म्हात्रे, शहर प्रमुख, आगरी सेना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.