मुंबई

ग्रामीण भागात ३३ प्राथमिक शाळा अनधिकृत

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : सध्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे, पण पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शासनमान्य शाळेतच घ्यावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३३ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला एक लाख रुपये दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी दहा हजारप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांना सुरुवातीला नोटीस बजावण्यात आली होती, त्यानंतर काही शाळा बंद करण्यात आल्या. तर काही शाळांनी पुनश्च शाळा सुरू न करण्याचे हमी पत्र सादर केले. अनधिकृत शाळांवर प्रशासनामार्फत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण व इतरत्र शहरी भागातील अनधिकृत शाळेत पालकांनी प्रवेश घेऊ नये. यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असून पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी शाळेबद्दल अधिक माहिती घेऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.............................................
* अनधिकृत शाळांची यादी
* अंबरनाथ तालुका
१ गोकुळ कॉन्व्हेट स्कूल
२ समर्थ स्कूल, नेवाळी
३ सनशाईन इंग्लिश स्कूल, उमरोली
४ विवेकानंद इंग्लिश स्कूल, अडीवली
५ निलम इंग्लिश स्कूल, अडीवली
६ गायत्री विद्यामंदिर, ता. अंबरनाथ.
७ ऑरबिट इंग्लिश स्कूल, अडीवली
८ गगनगिरी इंग्लिश स्कूल, अडीवली प्राथमिक

*भिवंडी तालुका
९ नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे
१० देविका इंग्लिश मीडियम स्कूल, काल्हेर
११ द विनर्स इंग्लिश मीडियम स्कूल, कांबे
१२ अवेंचुरा इंग्लिश स्कूल, कोन
१३ अग्निमाता इंग्लिश स्कूल, पिंपळास
१४ व्ही. पी. इंग्लिश स्कूल, पिंपळास
१५ समर्थ विद्यालय तलाईपाडा, पिंपळनेर
१६ सुगराबिबी इंग्लिश स्कूल, तळवली
१७ ग्लोबल इंग्लिश स्कूल, वडूनघर
१८ इंग्लिश मीडियम स्कूल, कुंदेफाटा
१९ इकरा इंग्लिश स्कूल, पडघा
२० प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, भोईरपाडा

कल्याण तालुका
२१ जी. के. इंग्लिश हायस्कूल, खडवली
२२ डिन्गेटी कॉन्व्हेट स्कूल, कोळेगाव
२३ नवज्योती बेथनी विद्यापीठ, रुंदे
२४ युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, टिटवाळा
२५ सरस्वती इंग्लिश स्कूल, दहिसर
२६ आयडीएल इंग्लिश स्कूल, दहिसर
२७ सावित्रिबाई फुले इंग्लिश प्रायमरी स्कूल, म्हारळ
२८ सिबॉयसीस इंग्लिश स्कूल, कोंदेरी
२९ रायन इंटरनॅशनल स्कूल, डोंबिवली
३० बी.बी.आर.आर.टी. स्कूल, कांबा

शहापूर तालुका
३१ एम. आर. राणे इंग्लिश स्कूल, आसनगाव
३२ शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शेरे
३३ एम.जे.वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कू‍ल,‍ आदिवली
..................
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन मान्यता असलेल्या शाळेत पाल्यांचे प्रवेश घ्यावेत.
- मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
.............................
पालकांना जागृत करण्याच्या उद्देशाने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करत आहोत. पालकांनी शाळांसंदर्भातील माहिती घेऊन शाळेत प्रवेश घेतले तर अनधिकृत शाळा बंद होतील.
- डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, ठाणे जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT