मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील अनेक गावांतील सार्वजनिक विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्यामुळे तालुक्यातील विहिरींची साफसफाई करण्याची मागणी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांना निवेदन देत विहिरींची तात्काळ साफसफाई करावी, अशी मागणी केली. या शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, इंटकचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र झुंझारराव, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, किसान काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक भावार्थे, विभागप्रमुख जयवंत हरड, दिलीप ठाकरे, भूषण धनगर, बाळकृष्ण साबळे, शिवाजी ठाकरे आदींचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.