मुंबई

दृष्‍टीक्षेप

CD

काळा किल्ला मराठी शाळेत मेळावा
मुंबई (बातमीदार) ः उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी धारावी काळा किल्ला मराठी शाळा क्रमांक दोनमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा तसेच स्वागतोत्सव समारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास शाळेचे विद्यार्थी , पहिलीत प्रवेश घेवू पाहणारे विद्यार्थी व त्यांचे पालकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी शाळाव्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व प्रथम शाळेचे प्रशिक्षक जयेंद्र कदम लिखित स्वागत गीत सर्व शिक्षकांनी गाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्या नंतर विद्यार्थ्यांचे फुले देवून, चॉकलेटस, बिस्किटे वाटून त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यपक सुनिल भांगरे यांनी विद्यार्थी व पालक यांना सदर प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले व नवीन शैक्षणीक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जयेंद्र कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या कला विभागातर्फे नुकतेच कै. सुविधा शंकर गोखले यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात युवा गायिका श्रुती विश्वकर्मा मराठे यांच्या अतिशय वैविध्यपूर्ण अशा सुश्राव्य गायनाचे सादरीकरण झाले. श्रुती यांनी आपले गुरू स्व. लक्ष्मण बोडस यांनी रचलेल्या विलंबित बंदिशीतून सुरवातीला प्रभातकालीन अहिरभैरव राग उलगडला व त्याला आपले गुरू स्व. केदारजी बोडस यांनी रचलेल्या द्रृत बंदिशीची जोड देत अतिशय उत्तम उत्तरार्ध सादर केला. त्यानंतर पं. गजानन बुवा जोशी तसेच पं. चंद्रशेखर रेळे यांनी रचलेल्या शुद्ध सारंग रागातील दोन द्रुत बंदिशीने सादर करून मैफलीत अधिक रंग भरला. त्यांना तबला साथ प्रणव गुरव यांनी तर संवादिनी साथ लिलाधर चक्रदेव यांनी दिली. तानपुर्‍यावरील साथीदार ऋतुजा कुलकर्णी व सुधांशु सोमण हे होते.

मालाड मच्छीमार्केट येथील झाड पडले
मालाड (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मच्छी मार्केट येथील झाड शुक्रवारी (ता. १६) अचानकपणे कोसळला. या वेळी बाजारात गर्दी होती मात्र कोणालाही इजा झाली नाही. मात्र या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चर्चांना उधाण आले आहे. झाडाच्या बुंध्यालगत अवती भोवती सिमेंट काँक्रिटिकरण केल्यामुळे कदाचित हे झाड पडले असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील झाडांचा सर्व्हे करून कार्यवाही करण्याची गरज आहे.

राजाराम शेठ विद्यालयात उत्‍साह
मुलुंड (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत मुलांसह शिक्षकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण होते. शाळेतल फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढल्‍या होत्‍या. या वेळी गुलाबपुष्प देऊन शहनाईच्या स्वरात सर्वांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर यांनी केले. याप्रसंगी मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी गोड गोड शिरा सर्व विद्यार्थ्यांना देऊन दिवस गोड करण्यात आला.

मालवणीतील रस्ते चिखलमय झाले
मालाड (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक आठ अंबोजवाडी येथील रस्ते झाले चिखलमय झाले आहेत. मालवणीतील या भागात पावसाच्या पहिल्या सरीने रस्‍त्‍यावर चिखल साचला आहे. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि दिव्यांग व्यक्तींना येथून प्रवास करणे अवघड जात आहे. या भागात जवळपास पंचवीस हजार लोकवस्ती असूनसुद्धा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. या वसाहतीत अधिकतर दररोज काम करून पोट भरणारे कामगार, फेरीवाले, छोटे व्यवसायी आहेत. तसेच वाहनचालकांना येथून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सरस्वती विद्यालयात पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत
मुलुंड (बातमीदार) ः कांजूरमार्ग येथील सरस्वती विद्यालय या शाळेतील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे भेटवस्तू व पुषपगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी स्वागत केले. या प्रसंगी उपाध्यक्ष रमेश कोचरेकर व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नानासाहेब पुंदे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मयुरी सावंत, सुमेधा जंग, रामदास हजनकर आणि प्राथमिक विभागाचे शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT