मुंबई

नवी मुंबई पोलिस दलात फेरबदल

CD

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : राज्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन २१ पोलिस अधिकारी नवी मुंबईत दाखल होणार आहेत.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस निरीक्षकांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. यात विहीत कालावधी पूर्ण न झालेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये पोलिस निरीक्षक सुनील पाटील (ठाणे शहर), शत्रुघ्न माळी (रायगड) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक स्मिता जाधव, नितीन गिते, निशिकांत विश्वकार, भारत कामत, राजू सोनवणे, विजय वाघमारे, संदिपान शिंदे, अर्जुन गरड, विजय कादबाने यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बापुराव देशमुख, प्रमोद पवार यांची मुंबई शहरात, तसेच दत्तात्रय किंद्रे यांची पालघरमध्ये बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात रिक्त होणाऱ्या जागी राज्यातील इतर भागांतून बदली झालेले २१ नवीन अधिकारी नवी मुंबई आयुक्तालयात दाखल होणार आहेत. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, संजय बेंडे, सुनील वाघमारे, दीपाली पाटील, अजय शिंदे, जितेंद्र मिसाळ यांचा समावेश आहे. तसेच ठाणे शहरातील तुकाराम पवळे, गुलफरोज मुजावर, राजेंद्र कोते, रायगडमधील पोलिस निरीक्षक मारुती सकपाळ, मुंबई लोहमार्गात कार्यरत असलेले प्रवीण भगत यांचा समावेश आहे.
-------------------------------
अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही
पोलिस आस्थापना मंडळातर्फे प्रत्येक आयुक्तालयात सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (ता.१६) काढण्यात आले आहेत. या बदली आदेशानुसार या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे पोलिस अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी वेळेत हजर होणार नाहीत, अशांवर शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT