मुंबई

अनधिकृत धाब्यांवरील मद्यप्राशन भोवणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : जिल्ह्यातील महामार्गालगत अथवा ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृतपणे धाबे उभारण्यात आले आहेत. या धाब्यांवर मद्य प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मद्य रिचवले जात असते. त्यातच आता या अनधिकृत धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार कल्याण, टिटवाळा, डोंबिवली परिसरात असणाऱ्या अनधिकृत धाब्यांवर दारू पिणाऱ्या २० तळीरामांना ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले आहे. या मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
परराज्यांतील विक्रीस बंदी असलेल्या मद्याची विक्री करण्याबरोबरच त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गावठी दारू, दुसऱ्या राज्यातील मद्य असे गैरप्रकार रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. अशातच आता, राज्य शुल्क उत्पादन विभागाने अनधिकृत धाब्यांवर मद्याची विक्री करणारे आणि मद्यपी अशा दोघांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अनधिकृत धाबे किंवा गावठी दारूच्या गुत्त्यावर दारू पिताना आढळून आलात की तुम्हाला पोलिसी कारवाईला समोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्याच्या द्रुतगती मार्ग अथवा मोकळ्या भूखंडांवर अनेक अनधिकृत धाबे तयार झाले आहेत. धाब्यावर जेवणाचा स्वाद वेगळा असतो. त्यामुळे अशा धाब्यावर दारूची पार्टी करण्यासाठी तळीराम जातात; परंतु असे अनधिकृत धाबे उत्पादन शुल्क विभागाच्या नजरेत आले आहेत. कल्याण, तिसगाव, नेतीवली, टिटवाळा आदी भागांतील धाब्यावर कारवाई करून अनधिकृत मद्य पिणाऱ्यांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार नुकतेच ठाणे उत्पादन शुल्क विभागाने कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई, डोंबिवली आदी भागांतील अनधिकृत धाब्यांवर दारू पिणाऱ्या २० तळीरामांवर कारवाई करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांनी दिली.
.................................
उत्तनमध्ये हातभट्टीवर छापा
उत्तन परिसरात गावठी दारूच्या गुत्त्यावर छापा मारून गुन्हा अन्वेषण मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे हातभट्टी दारू गुत्त्यांवर कारवाई करत दोन मालक आणि १८ तळीराम यांना ताब्यात घेतले. तसेच गावठी दारू, देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. या अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दंडात्मक कारवाई करीत एक लाख ५४ हजारांचा दंड ठोठावला असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाकडून देण्यात आली.
.....................

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयाने अवैध धाब्यांवर विशेष मोहितेअंतर्गत कारवाई करत १६ गुन्हे दाखल केले आहेत. यात २० मद्यपींना अटक करण्यात आली असून विदेशी मद्य १८.४ लिटर, देशी मद्य ३१.२५ लिटर, बियर-३३.५ लिटर, गावठी दारू ११० लिटर असा मिळून ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT