मुंबई

आता ठाण्यातही सिडकोची घरे

CD

हेमलता वाडकर
ठाणे, ता. १८ : नवी मुंबईत सर्वसामान्यांना दर्जेदार घरे उपलब्ध करून देणारी सिडको लवकरच ठाण्यातही भव्य हाऊसिंग प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. याला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाचे निमित्त ठरले आहे. ठाण्याच्या किसननगर भागात क्लस्टरच्या कामाला सुरुवात सिडकोच्या माध्यमातून सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकल्प बांधणीच्या खर्चाचा ‘महामेरू’ सिडकोने आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्या मोबदल्यात सिडकोला त्याच परिसरात भूखंड उपलब्ध होणार असून तिथे भव्य हाऊसिंग प्रकल्प सिडको उभारणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला ठाण्याच्या किसननगर येथून सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन वर्षांत १० हजार घरे येथे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भूखंड क्रमांक १८६, १८७ वरील सात हजार ७५३ चौरस मीटर क्षेत्रफळ, तसेच रस्ता क्रमांक २२ लगतचा भूखंड क्रमांक एफ- ३ वरील १९ हजार २७५ चौरस मीटर क्षेत्रफळ उपलब्ध झाले आहे. मुंबई महापालिका आणि खासगी विकासकाचे हे भूखंड आहेत. क्लस्टर योजनेच्या १ आणि २ आराखड्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे. वास्तविक हा प्रकल्प सुरुवातीला खासगी विकासकांकडून राबवला जाणार होता. पण इतक्या मोठ्या प्रकल्पाबाबत साशंकता असल्याने कोणताही विकासक पुढे येत नसल्याचे पाहून सिडकोमार्फत क्लस्टर योजना राबावण्यावर शिक्कामोर्तब झाले.
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सिडको आणि पुढच्या टप्प्यांसाठी महाप्रितद्वारे क्लस्टरची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. येथे २२ ते २७ मजल्यांचे टॉवर उभारून लाभार्थ्यांना ३२३ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. याशिवाय रुंद रस्त्यांसह उद्याने, पाळणाघर, रुग्णालय, शाळा अशी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प आहे, पण हजारो कोटी रुपये खर्च करून सिडकोने येथे क्लस्टर योजना यशस्वी केल्यानंतर त्यांना उर्वरित भूखंडावर स्वतःच्या योजनेची घरे उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याच्या वेशीवरच सिडकोला भूखंड उपलब्ध होणार असून त्याठिकाणी सेलेबल हाऊसिंग प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या गृह प्रकल्पातून सिडको क्लस्टरसाठी खर्च झालेल्या निधीची भरपाई करून घेणार आहे.
..
असा साधणार खर्चाचा ताळमेळ
किसननगरमध्ये सध्या सुमारे ३० हजार कुटुंबे राहत आहेत. त्यांना क्लस्टर योजनेंतर्गत घरे देण्याची योजना आहे. पहिल्या युआरसीत १० हजार घरे आणि युआरसी २ आणि गरज भासल्यास युआरसी तीनमध्ये घरे देण्यात येणार आहेत. हा प्रकल्प राबवण्यासाठी अंदाजे १५ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्या व्यतिरिक्त १५ टक्के भूखंड रस्ते आणि इतर सोयीसुविधांसाठी आठ हेक्टर भूखंड लागणार आहे. सध्या या योजनेसाठी ३८ हेक्टर इतकी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सिडकोकडे क्लस्टर योजना प्रकल्प उभारल्यानंतरही १० हेक्टरच्या आसपास भूखंड उरतो. या भूखंडावर सिडको प्लॉटिंग करणार असून तिथे गृह प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे किंवा ती जागा विकासकांना हस्तांतरित करून तेथे गृह प्रकल्प योजना राबवून घेणार आहे.
.....
सुनियोजित विकास होणार
संक्रमण शिबिरात न पाठवता क्लस्टर लाभार्थ्यांना थेट घराच्या चाव्या मिळणार आहेत. हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यासाठी सुरुवातीला उपलब्ध झालेल्या भूखंडावर घरे उभारली जातील. तेथे १० हजार कुटुंबांचे स्थलांतर केले जाईल. ज्या परिसरातून हे स्थलांतर होईल तेथील भूखंड मोकळा करून मग तेथे इमारतींच्या बांधणीला सुरुवात होईल. अशाप्रकारे परिसराचा सुनियोजित विकास केला जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT