मुंबई

मुख्य आरोपीला अटक करून कारवाई करा

CD

कळवा, ता. १८ (बातमीदार) : कळवा येथे शुक्रवारी रात्री (ता. १६) पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमात अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक व मारहाण झाली होती. या प्रकारामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी परिमंडळ १ चे उपायुक्त व कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याकडे केली आहे.
अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अयोध्या पोळ यांना बोलावण्यात आले होते. कार्यक्रम सुरू झाल्यावर त्यांच्यावर शाईफेक करून मारहाण करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार राजकीय हेतूने प्रेरित होता; परंतु धनगर समाजाचा या राजकारणाशी काहीही संबंध नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या महिलांच्या आदर्श आहेत, असे असताना एका महिलेचा अवमान करणे हा अहिल्याबाईंचा व धनगर समाजाचा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या सर्व घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी धनगर प्रतिष्ठानने निवेदन देऊन केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT