pregnant woman sakal
मुंबई

Mumbai : गर्भवती महिलांच्या कोविड व्यवस्थापनात भारत उत्तम

पहिल्या लाटेत १६२ पैकी १३५ सौम्य लक्षणांच्या होत्या; तर २७ महिला तीव्र संसर्गाच्या होत्या. २७ महिलांना आयसीयू, एचडीयूमध्ये दाखल करण्याची गरज भासली होती.

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा

Mumbai - कोविड महामारीच्‍या काळात इतर देशांच्या तुलनेत गर्भवती महिलांच्या कोविड व्यवस्थापनात भारताचे काम सर्वोकृष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थानच्या संशोधकांनी कोविडच्या तिन्ही लाटांचा अभ्यास केला.

यात नायर रुग्णालयाच्या तिन्ही कोविड लाटांमधील गर्भवती महिलांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामध्ये इतर देशांच्‍या तुलनेत भारतातील मृत्यूदर कमी असल्‍याचे पुढे आले. त्‍यामुळे इतर देशांच्‍या तुलनेत कोविड व्‍यवस्‍थापनावर भारताचे नियंत्रण चांगले राहिले.


नायर रुग्णालय कोविड महामारीत समर्पित कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईच्या सर्व गर्भवती कोविड महिलांवर नायर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.
नायर रुग्णालयात पहिल्या लाटेत १६२ लक्षणे असलेल्या गर्भवती कोविड आणि स्तनदा माता दाखल झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेत २३४ आणि तिसऱ्या लाटेत १३७ कोविड संसर्गग्रस्त गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या.

पहिल्या लाटेत १६२ पैकी १३५ सौम्य लक्षणांच्या होत्या; तर २७ महिला तीव्र संसर्गाच्या होत्या. २७ महिलांना आयसीयू, एचडीयूमध्ये दाखल करण्याची गरज भासली होती. ८ मृत्यू नोंदवण्यात आले होते. दरम्यान, दुसऱ्या लाटेत डेल्टा हा प्रकार तीव्र संसर्गाचा आढळल्याने यात सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. २३४ गर्भवती कोविड महिलांपैकी १४८ या सौम्य लक्षणांच्या होत्या. ८६ महिलांना तीव्र संसर्ग आणि ८७ महिलांना आयसीयू आणि एचडीयूत दाखल करण्यात आले होते.

आणि मृत्यूदर वाढून ३८ महिलांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना होणाऱ्या संसर्गात घट झाली आणि १३७ महिलांपैकी जवळपास ९८ टक्के महिलांना म्हणजेच १३५ महिला या सौम्य लक्षणांच्या होत्या. यात मृत्यूदर कमी होऊन फक्त एका गर्भवती महिलेचा मृत्यू नोंदला गेला. दरम्यान, वरील आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत कोविड संसर्ग तीव्र होता. ज्याचा त्रास गर्भवती महिलांनाही सर्वाधिक झाला. याच डेटाची तुलना इतर देशांसोबत केल्यास भारतातील मृत्यूदर हा कमी आहे.

जागतिक बँकेने देशांच्या केलेल्या गटवारीनुसार, मलावी हा कमी उत्पन्न असलेला देश आहे. तिथे कोविडच्या दुसऱ्या लाटेपेक्षा पहिली लाट खूपच गंभीर होती. तिथे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण भारताच्या पाचपट होते. तसेच भारत, ब्राझील, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि मॅक्सिको या देशांची कमी ते मध्यम उत्पन्न असलेले देश म्हणून संबोधले जातात.

या देशांचा आर्थिक स्तर हा सारखा असला तरीही कोविड-१९ चा परिणाम या देशांमध्ये वेगवेगळा होता. त्यामुळे विषाणू सारखा असला तरी आजाराचे परिणाम ठरवणारे जटिल सामाजिक-सांस्कृतिक घटकांचे जाळे प्रत्येक देशांत वेगवेगळे असते, असा तर्क काढला.

विविध स्‍तरांवरील अभ्यासातून निकष
विषाणूचा परिणाम काय होईल, त्यातून मृत्यू किती होतील? हे ठरवण्यासाठी स्थानिक घटक महत्त्‍वाची भूमिका बजावतात. स्थानिक घटकांमध्ये गर्भवती महिलेला कोणत्या महिन्यात कोविड संसर्ग झाला, तिने किती लवकर दवाखाना गाठला, त्या दवाखान्याचे उपचारांसाठीचे व्यवस्थापन कसे होते, तसेच तिचे निदान कसे आणि किती वेळात झाले, आरोग्य यंत्रणा सक्षम किती, जनजागृती किती, या सर्व घटकांवर आधारित मृत्यू प्रमाण आणि परिणाम अवलंबून असतो.

अनेक आर्थिकदृष्ट्या समान असलेल्या देशांमध्ये कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण सारखे नाही. मृत्यूच्या आकडेवारीतील हा फरक हे सूचित करतो की, गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या आरोग्यावरील परिणाम निश्चित करण्यासाठी शेवटी स्थानिक घटक जबाबदार असतात. लोकांच्या आरोग्यविषयक गरजा काय, त्या समजून घेणे गरजेचे आहे. आपण भविष्यातील साथीच्या रोगांसाठी चांगली तयारी केली पाहिजे. लोकांच्या आरोग्याच्या गरजेनुसार नियोजन केले तरच ही तयारी पूर्ण होऊ शकते.
- डॉ. राहुल गजभिये, शास्त्रज्ञ, ई-आयसीएमआर-एनआयआरआरसीएच

गर्भवती महिला हाय रिस्क कॅटेगरीत -
ओमिक्रॉनच्या कालावधीत भारतातील गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण ०.७% होते; तर दक्षिण आफ्रिकेत हेच प्रमाण ४.५% होते. भविष्यातील साथीच्या रोगांसाठी धोरण
विकसित करताना त्याच्या प्रत्येक टप्प्यात सामान्य लोकांचा सहभाग आवश्यक आहे, असे अभ्यासात सहभागी असलेले आयसीएमआर-एनआयआरआरसीएचमधील
वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. हृषिकेश मुनशी म्हणाले.

आयसीएमआर- एनआयआरआरसीएच निदेशिका डॉ. गीतांजली सचदेवा यांच्या मते, ‘कोविड-१९ सारखे तीव्र गतीने पसरणाऱ्या रोगांपासून बचावासाठी आतापासून तयारी करायला हवी. त्यासाठी योग्य संशोधन अभ्यास ठेवणारे दिशादर्शकांची गरज आहे. देशातील विविध संशोधन संस्थांनी एकत्र येत प्रयत्न केल्यास आजारांसाठी उत्तम राष्ट्रीय संसर्गजन्य रोग
प्रतिबंध कार्यक्रम अमलात आणता येईल.

हा अभ्यास नायर रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. निरज महाजन आणि चमूने केला आहे. गरोदर आणि स्तनदा स्त्रिया गर्भधारणेदरम्यान त्यांच्या शरीरातील शारीरिक
बदलांमुळे संक्रमणास असुरक्षित असतात. त्यामुळे हा अभ्यास भारत आणि इतर देशांमधील गरोदर आणि स्तनदा स्त्रियांवर झालेल्या कोविड-१९ च्या प्रभावावर प्रकाश टाकतो, असे डॉ. महाजन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT