Mumbai Rain Update: 
मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा जोर वाढला, शहर व उपनगरांत साचले पाणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला असून शहर व उपनगरांत सखल भागात पाणी साचले आहे. महापालिकेने पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने येथील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली; तर मालाड येथे अंगावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.

सकाळी नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली; मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत राहिल्याने त्यांना कामावर पोहचता आले. रस्त्यावरच्या वाहतुकीचा वेग मात्र मंदावला होता. दरम्यान, हवामान विभागाने येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

गेल्या शनिवारपासून मुंबईत दाखल झालेला पाऊस सलग दोन दिवस जोरदार कोसळला. त्यानंतर सोमवार, मंगळवार काहीशी विश्रांती घेत सरीसरीने कोसळला. बुधवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत संततधार सुरू झाली. हवामान विभागाने पुढील तीन तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिकेने पाणी साचणाऱ्या सखल भागात आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.


सकाळपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत जोरदार बरसला. अंधेरी सबवेत तर पहिल्याच पावसात पाणी साचले होते. बुधवारीही पावसामुळे येथे पाणी साचल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता.


मुंबई महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केल्याने काही वेळातच पाण्याचा निचरा झाला. अंधेरी सबवेत पाणी तुंबल्याने हा सबवे पाण्याचा निचरा होईपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. तोपर्यंत या परिसरातील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या.

मालाड येथे अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला. काही ठिकाणी घराच्या भिंती, भिंतीचा भाग कोसळला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दरम्यान, येत्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पाणी साचलेली ठिकाणे -


अंधेरी सबवे, दहिसर, भांडुप, सायन-गांधी मार्केट, साकीनाका, चेंबूर शेल कॉलनी, कुर्ला, घाटकोपर, मालाड, वांद्रे, मानखुर्द, धारावी टी जंक्शन, दादर टीटी, मुलुंड, भायखळा आदी.

२६ ठिकाणी झाडे पडली -

मुंबई शहरात ४ ठिकाणी, उपनगरांत ८, पश्चिम उपनगरांत १४ अशा २६ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. मालाड येथे अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घराचा भाग कोसळला

शहरात १, पूर्व उपनगरांत ३ व पश्चिम उपनगरांत १ अशा पाच ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या.

पालिका आयुक्तांनी केली पाहणी


मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हिंदमाता येथील पंपिंग स्टेशन, सेंट झेवियर्स मैदानातील भूमिगत पाणी साठवण टाकीची पाणी केली. मिठी नदी, वाकोला मिनी पंपिंग स्टेशन, धारावी टी जंक्शन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे या पाणी साचणाऱ्या सखल भागांत पावसाळी उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला.

संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त रमाकांत बिरादार, उल्हास महाले, सहायक आयुक्त महेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

अंधेरी सबवे बंद

जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी तुंबल्याने हा सबवे बंद ठेवण्यात आला होता. येथील वाहतूक एस. व्ही. मार्गाने वळवण्यात आली. वाहतुक खोळंबल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. महापालिकेने येथे पंप लावून पाण्याचा निचरा केल्याने काही वेळात येथील वाहतूक सुरळीत झाली.

पावसाची नोंद-

कुलाबा - ७७ मिमी

सांताक्रुज - ७७ मिमी

दहीसर - १५४.५ मिमी

जुहू /विमानतळ - ७१.५ मिमी

राम मंदिर - ७६.५ मिमी

ठाणे - ११३.२ मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: राज्यात 24 सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस; मुंबईला सतर्कतेचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोनं अन् चांदीचा लिलाव, किती रुपयांची झाली विक्री?

Maratha Andolan: मराठा आंदोलकांची रात्री उशिरा शंभुराज देसाईंसोबत दीड तास चर्चा; बैठकीत निघाला महत्त्वाचा तोडगा

२२ September in History: नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे निधन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT