मुंबई

महिला प्रवासी कोट

CD

महिलांच्या प्रतिक्रिया
कामानिमित्त जुईनगर ते चुनाभट्टी असा प्रवास रेल्वेने करते. रात्रीच्या १० नंतर घरी येण्याची वेळ असते. रेल्वेने प्रवास करताना महिला डब्यांमध्ये महिला पोलिस नसते. त्याचा फायदा घेऊन अनेक पुरुष लेडीज डब्यांमध्ये चढतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये पोलिसांची गरज आहे.
- मनीषा झोडगे, जुईनगर
--------------------------------------
सीएसटी ते सानपाडा हा रात्री आठनंतरचा प्रवास असतो. या प्रवासामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा काही गर्दुल्ले लेडीज डब्यात येतात. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. लेडीज डब्यात महिला किंवा पुरुष पोलिस नसतो. त्यामुळे सानपाडा स्थानकाच्या बाहेर पोलिस गस्त वाढवली, तर महिलांना रात्रीच्या वेळी भीती वाटणार नाही.
- संगीता चव्हाण, सानपाडा
------------------------------------------
वाशी ते अंधेरी हा प्रवास अनेकदा रात्रीचा असतो. नोकरी करत असल्यामुळे घरी येण्याची वेळ ही ११ नंतरची असते. या वेळी लेडीज डब्यात बोटावर मोजण्याइतक्या महिला असतात. त्यामुळे रेल्वे स्थानक येईपर्यंत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा छेडछाड केल्याचे प्रसंग घडलेले आहेत.
- मीना गावकर, वाशी
----------------------------------
रात्रीच्या वेळी नेरुळ स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपी व गर्दुल्ल्यांचा वावर असतो. रेल्वेप्रमाणे स्थानकाबाहेरील परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. महिलांनीदेखील आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
- रूपाली रांजणे, नेरूळ
---------------------------------
बऱ्याचदा महिला डब्यांमध्ये पोलिस असतात. यामुळे महिलांना सुरक्षित वाटते. अनेकदा नोकरदार महिला उशिरा घरी जातात. अगदी शेवटच्या ट्रेनने महिला प्रवास करतात; परंतु पोलिसांमुळे सुरक्षित वाटते.
- नीलम लोखंडे, नेरूळ
---------------------------------
मी सीवूड्स स्थानकातून दररोज रेल्वेतून प्रवास करते. महिला डब्यांमधील एका तरी डब्यात पोलिस रात्रीच्या वेळी पोलिस असतात. उशिरा प्रवास करत असणाऱ्या महिलांनी जर डब्यामध्ये कोणीही नसतील, तर पुरुष डब्याचा वापर करावा. यामुळे स्वतःला सुरक्षित वाटेल.
- विद्या ताजने, सीवूड्स
--------------------------------------------------
रेल्वेतून दररोज अनेक महिला प्रवास करतात. काही महिला उशिरापर्यंत एकट्या प्रवास करतात. यामुळे अनेकदा मनामध्ये भीती असते. यामुळे महिलांचा प्रत्येक डब्यामध्ये एक तरी पोलिस असावे, यामुळे महिलांना सुरक्षित वाटेल, त्याचबरोबर महिलांनीदेखील सतर्क राहणे आवश्यक आहे.
- कांचन दाते, सीवूड्स
----------------------------------------------
नवी मुंबई स्थानकामध्ये पोलिस असतात. दुपारच्या वेळी जरी नसले, तरी महिला डब्यांमध्ये रात्रीच्या वेळी पोलिस असतात; परंतु स्थानकाबाहेरील परिसरामध्ये रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन मद्यपी गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
- प्रियांका बाळसराफ, बेलापूर
-----------------------------------------------
रबाळे रेल्वे स्थानकाहून प्रवास करताना भीती वाटत नाही; पण कधी सकाळी ट्रेनमध्ये महिला कमी असल्यावर घाबरायला होते.
- चंदन पवार, रबाळे
-----------------------------------------------
रबाळेहून ट्रेनमध्ये प्रवास पहाटे करावा लागतो. कधी सायंकाळी यायला उशीर होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पोलिस कर्मचारी महिला डब्यात असल्याने भीती वाटत नाही.
- अंकिता देसाई, रबाळे
-------------------------------------------
घणसोली रेल्वे स्थानकावरून ट्रेनने प्रवास करताना इतरांची भीती वाटत नाही; परंतु एका वेळेस ४-५ पुरुष फेरीवाले एकत्र चढल्यास घाबरायला होते. यावर प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यायला हवा.
- सोनाली पारधी, घणसोली
-----------------------------------------------
घणसोली रेल्वेमधून प्रवास करताना अनेकदा फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम होतो; तर अनेकदा बेघर नागरिक प्रवास करतात; तर चोरी होण्याची भीती वाटते.
- स्मिता पाटील, घणसोली
-----------------------------------------------
ट्रान्स हार्बर मार्गावर महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी हेल्पलाइन सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. वाशी, नेरूळ लोकलमधून रात्रीच्या वेळेला डब्यामध्ये पुरुष प्रवासी मद्यप्राशन करीत असतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
- आम्रपाली गायकवाड, प्रवासी
-------------------------------------
ट्रान्स हार्बर मार्गावर महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. महिलांच्या डब्यांमध्ये कधी आरपीएफचे पोलिस कधी असतात; तर कधी नसतात. महिलांच्या डब्यामध्ये महिला पोलिसच तैनात पाहिजे; पण ते कधी कधी नसतात. त्यामुळे अन्य महिलाबरोबरच प्रवास करावा लागतो.
- पूजा सूर्यवंशी, प्रवासी
------------------------------------------
रात्रीच्या वेळी तृतीयपंथी महिलांच्या डब्यामध्ये चढतात. त्यांचीदेखील भीती वाटते. कधी आरपीएफ तसेच पोलिस हे कधी असतात. तर कधी हे डब्यामध्ये नसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे एकट्या महिलेने धोकादायक आहे.
- अस्मिता लाड, प्रवासी
़़़़़़ः------------------------------------------
साधारण पाच वर्षांपूर्वी तुर्भे स्थानकात घडलेल्या विकृत प्रकाराने त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था म्हणावी, तशी चोख ठेवण्यात आलेली नाही. कधी कधी तर जीआरपी पोलिसदेखील फलाटावर नसतात. तुर्भे रेल्वे स्थानकात फलाटावर रेल्वे पोलिसांची गस्त असणे काळाची गरज आहे.
- लता कांबळे, प्रवासी
-------------------------------------------
तुर्भे स्थानकातून कामानिमित्त ये-जा करते. ज्याप्रमाणे रेल्वे पोलिस फलाटावर गस्त घालतात. त्याचप्रमाणे त्यांनी फलाटाबाहेरील रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालावी. कारण दुपारच्या वेळेस स्थानक परिसरातील वर्दळ कमी झालेली असतेय त्यामुळे गर्दुल्ले, भुरटे चोर चोरीच्या उद्देशाने बसलेला असतात. किमान रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिलांच्या डब्ब्यात रेल्वे पोलिस असतात.
- अनामिका मोकळ, प्रवासी
ः--------------------------------------------------------
महिला सुरक्षा पोलीस बल आकडेवारी

एकूण मंजुर पोलीस पदे - ३७८०
त्यापैकी कामावर रुजू पोलीस - ३०००
पोलिसांची रिक्त जागा - ७८०

कार्यरत पुरुष पोलीस - २२१८
कार्यरत महिला पोलीस - ७८२

सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रिक्त जागा - ०४
पोलीस हवालदार रिक्त जागा - १२
पोलीस नामदार रिक्त जागा - १०३
पोलीस शिपाई रिक्त जागा - ६६१

महिलांपेक्षा पुरुष अधिकाऱ्यांना झुकते माप
रेल्वे पोलीस दलात महिला पोलीस अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची वाणवा आहे. मंजूर ३५२ पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदांपैकी ३३४ जागांवर पुरुष पोलीस अधिकाऱ्यांची भर्ती केली आहे. तर या पदांवर फक्त १४ महिला अधिकारी भरण्यात आली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या अद्याप चार जागा शिल्लक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT